जिल्ह्य़ातील तलाठय़ांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने उद्या शुक्रवारीही हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
नायब तहसीलदारांची पदे थेट न भरता तलाठी व सर्कल यांच्या ज्येष्ठतेनुसार भरण्यात यावीत, मंडल अधिकाऱ्यांना कृषी पर्यवेक्षकाची वेतन श्रेणी मिळावी, तलाठी, मंडल अधिकारी यांच्यावर एखाद्या प्रकरणी थेट फौजदारी दावा दाखल करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी, सेवाज्येष्ठतेनुसार वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय.आर.पाटील, शरद नलवडे, के.डी.पोवार, अशोक कोळी, प्रदीप देसाई यांच्यासह १२ तालुक्यांतील संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी सहभागी झाले होते.