मुंबई येथे मंत्रालयामध्ये अंडर सेक्रेटरी या पदावर कार्यरत व मुळचे इचलकरंजीचे असलेले किरण पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘रिडिझाइनिंग बिझनेस प्रोसेस ऑफ डिस्ट्रिक्ट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, मुंबईचे डायरेक्टर डॉ.उदय साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. किरण पाटील यांनी मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, अर्थ व गृह विभागामध्ये विविध पदांवर तसेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम.के.सी.एल.) मध्ये जनरल मॅनेजर पदावर काम केले आहे.