इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशनचा ५१वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताह सोहळा नुकताच नवी मुंबई येथे पार पडला. विधानसभेचे सभापती दिलीप वळसे-पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करताना आपली सेवा शहरापुरती मर्यादित न ठेवता आदिवासी व दुर्गम भागात द्यावी, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच रोग्यांना जेनेरिक औषधांची माहिती देऊन औषधे कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला संघटनेचे सरचिटणीस एस.डी. जोग, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’चे अधिष्ठाता डॉ. पी. आर. वाव्हीया आदी मान्यवर उपस्थित होते.