ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या बी. एम. एम. विभागाच्या वतीने अलीकडेच आयोजिलेल्या ‘लेन्स मेनियाक’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनास विद्यार्थी आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाच्या पी. सावळाराम सभागृहात हे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
बी.एम.एम विभागाच्या विद्यार्थ्यांनी अलीक डेच हैद्राबाद येथे भेट देऊन येथील दूरदर्शन केंद्र, रामोजी फिल्म सिटी, गोवलकोंडा किल्ला, नेहरू झुऑलॉजिकल पार्क यांसारख्या विविध ठिकाणांची टिपलेली १२० हून अधिक छायाचित्रे तसेच आंध्र प्रदेश राज्यातून प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि मासिके यांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. सुमारे ७०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या प्रदर्शनास भेट दिली. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. नीता साने यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बी. एम. एम. विभागाचे प्रमुख जी.जी.हळदणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.