‘लोकसत्ता’ आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पध्रे’त विशेष पारितोषिक मिळाल्याबद्दल उपक्रमशील सामाजिक कार्यकर्त्यां प्रज्ञा प्रदीप वाळिंबे यांचा येथील ‘अंकुर’ खेळणीघराच्या पालक मंडळातर्फे कांतावती देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार बंडा भट यांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या या स्पध्रेचे महत्त्व विषद करताना, अंकुरच्या संचालिका प्रज्ञा वाळिंबे यांचे अभिनंदन केले. विद्या भोसले, एल. एम. घोरपडे, वर्षां ढाके, स्वाती देसाई, निधी नाडगौडा, शोभा भंडारे नमिता मोहिरे, राजन तांदळे, प्रमोद नलवडे, अनिल शिंगण, अंकुर परिवारातील शालन धुमाळ, नलिनी कुलकर्णी, ऊर्मिला कुलकर्णी यांच्यासह अंकुरच्या बालगोपाळांची यावेळी उपस्थिती होती.