बुद्धगया येथील बाँबस्फोटाचा नगरमध्ये निषेध

बौद्धधर्मीयांचे धार्मिकस्थळ असलेल्या, बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहारात झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या निषेधाच्या प्रतिक्रिया शहरात व्यक्त झाल्या.

बौद्धधर्मीयांचे धार्मिकस्थळ असलेल्या, बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहारात झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या निषेधाच्या प्रतिक्रिया शहरात व्यक्त झाल्या. विविध संघटनांनी एकत्र येत सकाळी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केले. निषेधसभाही झाल्या. काही चौकांमध्ये निषेधाचे फलकही लावण्यात आले आहेत. पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.
आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी सकाळी बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको करत बाँबस्फोटाचा व अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. भगवान बुद्ध हे शांतता व अहिंसेचे प्रतीक असल्याने शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन आरपीआयचे अशोक गायकवाड यांनी या वेळी केले. माजी नगरसेवक अजय साळवे, सुरेश वाकचौरे, विलास बोर्डे, हर्षवर्धन सोनवणे, नाना पाटोळे, सुधीर घंगाळे, विजय भांबळ, कौशल गायकवाड आदी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
बुद्धिस्ट सोसायटीच्या जिल्हा शाखेच्या वतीने दुपारी निषेध सभा घेण्यात आली. बौद्धधर्मीयांच्या पवित्र तीर्थस्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा या वेळी निषेध करण्यात आला. नगरसेवक विजय गव्हाळे, जत्येंद्र तेलतुंबडे, राजेंद्र साळवे, संतोष कांबळे आदींनी या वेळी शांतता व संयमाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Protestation of bomb blast of bodhgaya in nagar

ताज्या बातम्या