नाशिक जिल्हा व शहर पोलिसांतर्फे ‘रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत मनमाड शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रसाठय़ाची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
पोलीस निरीक्षक सी. डी. बनगर यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली. कार्यक्रमास विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे रायझिंग डे हा उपक्रम राबविला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वजसप्ताह साजरा केला जातो. याअंतर्गत आयोजित कार्यक्रमात छत्रे विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी मोठी फेरी काढण्यात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात बनगर यांनी पोलीस दलाकडील शस्त्रास्त्रांची माहिती दिली. पोलीस स्थानकात असणारी विविध शस्त्रे पाहून विद्यार्थी हरखून गेले. यावेळी विद्यार्थ्यांना बंदूक कशी असते, तिची रचना, ती कशी हाताळली जाते याबाबत माहिती देण्यात आली.
या सप्ताहात शहर पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात व्यापारी तसेच सराफ बांधव यांच्याशी चर्चा, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, कॉलनी आणि वसाहतींत जाऊन नागरिकांशी चर्चा करणे, संपर्क साधणे, संवाद साधणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढावा, तो अधिक वृिद्धगत व्हावा या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बनगर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
पोलीस दलाचा ‘रायझिंग डे’ उत्साहात
नाशिक जिल्हा व शहर पोलिसांतर्फे ‘रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत मनमाड शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रसाठय़ाची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
First published on: 04-01-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raising day of police department celebrated