‘पाणी वाचवा-देश वाचवा’ चा नारा देत मलकापुरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रॅलीद्वारे प्रबोधन केले. प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळा व स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे एक हजार विद्याथ्यार्ंचा त्यामध्ये सहभाग होता.  रॅलीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित आकर्षक चित्ररथ सहभागी करण्यात आले होते.
कन्याशाळा, शिवाजी चौक, नगरपंचायत कार्यालय मार्गे रॅली पुन्हा कन्याशाळेत आणण्यात आली. या पर्यावरण रॅलीचा प्रारंभ उद्घाटन संस्थेचे संचालक वसंत चव्हाण, मुख्याध्यापिका एस. व्ही. भिसे, अनिता रावते यांच्या हस्ते करण्यात आला. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सांगता व दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेतर्फे विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. रॅलीत कन्याशाळेच्या विद्यार्थिनींचे झांजपथक अग्रभागी होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीवर्षांची सांगता असल्यामुळे या रॅलीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनवण्यात आले होते. यशवंतरावांचे बालपण, १९६२ च्या भारत-चीन युध्दाचा प्रसंग, गं्रथ दिंडी, स्त्रीशक्ती व शेतकरी हिताचा निर्णय घेणारा जाणता राजा या विषयावरील चित्ररथ सहभागी झाले होते.