श्री क्षेत्र चाफळ येथील रामानंद वाचनालयाच्या माध्यमातून वाचन चळवळीला गती देण्याचे सुरू असेले कार्य कौतुकास्पद असून, चाफळचे भूषण असलेल्या या वाचनालयाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य ए. व्ही. रामुगडे यांनी केले.
चाफळ (ता. पाटण) येथील रामानंद वाचनालयाच्या वर्धापनदिनामित्त आयोजित गं्रंथ प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एल. एस. बाबर होते. उपसरपंच सतीश पाटील, वाय. आर. पाटील, शंकरराव पडवळ, गुलाब मुल्ला, बी. एस. देशपांडे, संभाजीराव देशमुख, किसनराव जाधव, अॅड. शिरीष पेंढारकर, डॉ. प्रा. शिरीष पवार, डी. एम. सुमार, दिलीप पाटील, दादासाहेब कवठेकर, तानाजी बाबर, निसार काझी, गं्रथपाल उमेश सुतार, लेखनिक गौरीहर पोतदार, महादेव पाटील, सर्जेराव माने, दिलीप भस्मे, आनंदराव इंगळे, संभाजी बाबर यांची या वेळी उपस्थिती होती.
ए. व्ही. रामुगडे म्हणाले की, गं्रथ हेच गुरू असल्याने सर्वानी ग्रंथाची कास धरून वाचनावर भर द्यावा. त्यासाठी वाचनालयाचे सभासदत्व घ्यावे. चाफळसारख्या ग्रामीण भागात रामानंद वाचनालयाच्या माध्यमातून खऱ्याअर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू आहे, हे चाफळकरांचे भाग्य म्हणावे लागेल. वाचनालयाचे विविध उपक्रम समाजहिताच्या दृष्टीने स्तुत्य आहेत. वाचनालयाच्या काटेकोर प्रशासनामुळे येथील वाचकांना योग्य सेवा दिली जात असल्याने वाचक सभासदांच्या संख्येत वाढ होत आहे.
या वेळी वाचनालयाच्या वतीने सर्व महिलांना मकरसंक्रांतीचे वाण म्हणून काचेचे भांडे देण्यात आले. महिलांनी ग्रंथ प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले. ग्रंथ प्रदर्शनाची मांडणी गं्रथपाल उमेश सुतार व लेखनिक गौरीहर पोतदार यांनी केली. गं्रथ प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनास पाटणच्या कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, प्रा. जमीर मोमीन, लोकशाहीर प्रभाकर कडव या मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन वाचनालयाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.