गो-विज्ञान अनुसंधान केंद्रातर्फे १० ते १६ जानेवारीदरम्यान संत विजयकौशल महाराज यांचे रामकथा प्रवचन आयोजित केले असल्याची माहिती अजय निलदावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.  रेशीमबाग मैदानावर १० ते १६ जानेवारीदरम्यान रोज दुपारी ३ ते ६ वाजेदरम्यान प्रवचन होईल. रामकथा प्रवचनात गोवंश रक्षा तसेच सर्व वयाच्या नागरिकांसाठी आहार- विहार, पथ्य-अपथ्याचे मार्गदर्शन केले जाईल. रोगनिदान शिबिरात कीडनी, रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा, कावीळ, खोकला, अस्थमा, सोरायसिस, संधीवात, एग्झिमा, बाल-महिला रोग, पांढरे डाग, कर्करोग आदींची तज्ज्ञांकरवी तपासणी व उपचार केले जातील. विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. गोविज्ञान प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. १५ ते २० हजार भक्त बसू शकतील, यासाठी ५० हजार चौरस फुटाचा मांडव घालण्यात आला आहे. यासंबंधी आज राजाबाक्षा हनुमान मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. सुरेश डवले, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, रामकृष्ण पोद्दार पत्रकार परिषदेला उपस्थित होते.