आजारी पत्नीला पाहाण्यासाठी आलेल्या एका मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना कोंढवा येथे गुरुवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
पांडुरंग नामदेव पवार (रा. समतानगर झोपडपट्टी, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ४२ वर्षीय महिलने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार याची पत्नी आजारी असल्यामुळे ही महिला आरोपीच्या पत्नीस पाहाण्यासाठी आली होती. त्याच्या पत्नीला पाहून ती जात असताना रस्त्यात पवार याने त्या महिलेला पाहिले. त्यांना रिक्षाने घरी सोडतो म्हणाला.
 मात्र, ती महिला चालत जाते म्हणून गेली. आरोपीने कोंढव्यातील रूपी बँकेच्या मोकळ्या मैदानाजवळ त्या महिलेच्या पाठीमागून जाऊन जबरदस्तीने त्या मैदानात नेऊन बलात्कार केला.
या प्रकरणी महिलेने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एम. पवार हे अधिक तपास करत आहेत.