जिल्हा सहकारी बँकेवरील दरोडय़ाची मालिका सुरूच आहे. आज कर्जत तालुक्यातील खेड शाखा लुटून दरोडेखोरांनी २६ लाख ८२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. खेड गावात भरवस्तीमध्ये सहकारभवन या व्यापारी संकुलात असणाऱ्या जिल्हा सहकरी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. दरोडा टाकणारी टोळी सराईतच असून त्यांनी यापूर्वी येऊन बँकेची पाहणी केली असावी असा संशय आहे. दरोडेखोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावर बँकेची शाखा आहे.
बँकेच्या शटरचे कुलूप व शटर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापले. सायरनची केबलही कापली. त्यांनतर त्यांनी स्ट्राँगरूमचे कुलूप व दरवाजा गॅस कटरने कापला व तिजोरीतील २६ लाख ८२ हजार ७७८ रूपयांची रोकड लांबवली. यापूर्वी पडलेल्या दरोडय़ांप्रमाणेच याही दरोडय़ाची पद्धत होती. वास्तविक या तिजोरीला कॉलींग मेसेज सिस्टीम आहे. मध्यरात्री तीन वाजता तिजोरी उघडताच या सिस्टीममधून शाखाधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला गेला, त्यावेळी सतर्कता
दाखवली असती तरी चोरी रोखता आली
असती.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यापूर्वी पोलीस निरीक्षक ढोकले, उपनिरिक्षक सोनवणे, गोसावी व खारतोडे हे घटनास्थळी पोहचले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याच इमारतीत युनियन बँकेचीही शाखा असून तिकडे मात्र दरोडेखोर फिरकलेदेखील नाहीत.
मांडवगण, भांबोरा, माहीजळगाव यासह जिल्हा बँकेच्या विविध शाखांवर यापूर्वी असेच दरोडे पडले असून बँकेकडून मात्र काहीही सुरक्षाव्यवस्था केली जात नाही. त्यामुळे बँकेची विश्वासार्हताच ऐरणीवर आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
२६ लाखांची रोकड लांबवली
जिल्हा सहकारी बँकेवरील दरोडय़ाची मालिका सुरूच आहे. आज कर्जत तालुक्यातील खेड शाखा लुटून दरोडेखोरांनी २६ लाख ८२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. खेड गावात भरवस्तीमध्ये सहकारभवन या व्यापारी संकुलात असणाऱ्या जिल्हा सहकरी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.
First published on: 24-01-2013 at 04:33 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of 26 lakhs in district bank of khed