चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले सतरा लाख
सातारा रस्त्यावरील रॉयल आर्केडमधील राजाराम बापू सहकारी दूध संघाचे कार्यालय फोडून सतरा लाखांची रोकड, सोने व चांदीचे दागिने असलेली तिजोरीच चोरून नेली. मात्र, एका खासगी कंपनीच्या चालक सोसायटीच्या आवारात मोटार घेऊन येत असल्याचे पाहून चोरटे तिजोरी त्या ठिकाणीच टाकून पळाले. चालकाने ही तिजोरी पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.. कार्यालयाच्या कामकाजाची माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच चोरीचा हा कट रचला असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर यांनी सांगितले, की कार्यालयात शनिवार, रविवारी जमा झालेली मोठी रक्कम असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीनेच चोरीचा कट रचल्याचे दिसून येत आहे. हे कृत्य कार्यालयाची माहितीगार व्यक्तींनेच केल्याचा संश असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.