रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘रोटरी ट्रेड फेअर’चे १६ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक व ग्राहक यांच्यात सुसंवाद साधणारे गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, अत्याधुनिक फोर व्हिलर्स यांचे भव्य प्रदर्शन व विक्री राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील यांनी दिली.
आजच्या महागाईच्या युगात गृहिणींना बजेट सांभाळावे लागते. त्यांच्यासाठी गॅस वाचविणारी उपकरणे, विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेसबद्दल माहिती, पाणी शुध्दीकरणाची विविध उपकरणे, व्यायामाची साधणे, फोर व्हिलर्सची नवीन मॉडेल्स, खवय्यांसाठी विविध प्रांतातील लज्जतदार खाद्य पदार्थांचे अनेक स्टॉल्स, मुलांसाठी डिस्ने पार्क, जादूचे प्रयोग, विनोद, मिमिक्री, गाणी, लहान मुलांचे डान्स आदी बहारदार कार्यक्रम, दर तासाला लकी ड्रॉ व भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे असा हा सर्व परिवारासह खरेदी व मनोरंजनाचा आनंद एकत्र अनुभविण्याची पर्वणी या निमित्ताने इचलकरंजीकरांना उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनामध्ये १०० स्टॉलचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, पुणे, बेळगाव, मुंबई, गोवा आदी ठिकाणांहून नामवंत कंपन्या आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. फोर व्हिलर्समध्ये जनरल मोटर्स,
रिनॉल्ट्स, व्होल्सव्ॉगन, रिव्हरसाईड होंडा, मारुती सुझुकी, हुंदाई मोटर्स, कायझन होंडा इत्यादी नामवंत कंपन्या सहभागी होऊन आपले नवीन मॉडेल्स प्रदर्शित करणार आहेत.
या भव्य व्यावसायिक प्रदर्शनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व यू. बी. ज्वेलर्स यांनी संयुक्तरीत्या रोटरी यू.बी.आयडॉल इचलकरंजी अशी स्पर्धा आयोजित केली आहे. तरी कलाकारांनी आपली नावे लवकरात लवकर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी येथे नोंदवावीत, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील, सेक्रेटरी गिरीष कुलकर्णी, रोटरी ट्रेड फेअरचे राजेश कोडुलकर, ट्रेड फेअर सेक्रेटरी अभय यळरूटे, स्टॉल प्रमोशन महादेव खारगे, प्रसिध्दी कमिटी चेअरमन श्रीहरी कामत, प्रकाश गौड आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
इचलकरंजीतील रोटरी क्लब तर्फे व्यापार मेळ्याचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘रोटरी ट्रेड फेअर’चे १६ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक व ग्राहक यांच्यात सुसंवाद साधणारे गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, अत्याधुनिक फोर व्हिलर्स यांचे भव्य प्रदर्शन व विक्री राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील यांनी दिली.
First published on: 13-01-2013 at 07:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rotary club of ichalkaranji organized rotary trade fair