दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीतर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना बुधवारी वरळी येथे दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात ‘हिरकणी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये माजी महापौर अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सुषमा देशपांडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. विजया बांगडे, कवयित्री श्रद्धा बेलसरे-खारकर, लेखिका शुभांगी भडभडे, अंध पत्रकार अनुजा संखे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, सुशीला साबळे, सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. साधना झाडबुके यांचा समावेश होता.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, वैजयंती कुलकर्णी-आपटे, श्री. वि. देशपांडे यांच्यासह स्वतंत्र निवड समितीने या पुरस्कारासाठी महिलांची निवड केली.  
या कार्यक्रमाचा वृत्तान्त ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Pimpri, Pimpri Mahayuti meeting
पिंपरी : महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य! बारणे यांचा प्रचार करणार नाही, आरपीआय गटाची भूमिका
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान