समाजातील भरकटत चाललेल्या तरुणाईस विधायक वळण देण्यासाठी साथी एस.एम.जोशी युवामंचच्या वतीने ३१ डिसेंबर अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.    
युवा मंचच्या वतीने मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने सरत्या वर्षांला निरोप व नववर्षांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १ हजार पणत्या प्रज्वलित करून उपस्थितांना व्यसनमुक्ती-पर्यावरणाची शपथ देण्यात आली. तसेच या वेळी विशेषकरून उसाचा रस व दूध याचेही वाटप करण्यात आले. रात्री ९ ते ११ या वेळेत सुचित्रा मोर्डेकर यांच्या कलांजली ग्रुपच्या सुगम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने ३१ डिसेंबर साजरा करता येतो, असा आदर्श युवा मंचने तरुण पिढीसमोर ठेवला. या वेळी माजी महापौर शिवाजीराव कदम, भिकशेट पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, बालकल्याणचे अधीक्षक अंगडी मॅडम, संकुलातील विद्यार्थी, कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा मंचचे संस्थापक मुरलीधर परुळेकर, श्वेता परुळेकर, सुनील काळदाते, ज्योती गारूले, उमेश हेबाडे, चारुशीला पाटील, चंद्रकांत कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.