तालुक्याच्या काटवन भागातून चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणाऱ्या निळगव्हाण येथील वसंत मोतीराम अहिरे या संशयितास कँप पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वसंत हा चंदनाची झाडे तोडून शहराकडे निघाल्याची गुप्त माहिती कँप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार येथील नामपूर रस्त्यावर दूध डेअरीजवळ सापळा लावला असता तो एका वाहनातून येत असताना आढळून आला. त्याच्या वाहनाची झडती घेतली असता एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा माल जप्त केला. संशयिताला अटक झाल्यानंतर या तस्करीमागे असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.