येथील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाला दीर्घायु केंद्राच्या वतीने आदर्श संघाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष बी. आर. जोशी, अशोक ठाकूर यांनी हा पुरस्कार खा. अनु आगा यांच्या हस्ते स्वीकारला.
ज्येष्ठ नागरिक स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी बी. सी. देशमुख यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शरदचंद्र भोसले, माजी पोलीस महासंचालक जयंत उभराणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना जोशी यांनी भविष्यात संघ ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य निरामय राहण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.