महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात येणारे ‘शिक्षण तपस्वी’ जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात बारा वर्षांपेक्षा अधिक काळ कार्य करणाऱ्या २१ शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण सोहळा २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़गृहात करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यास कवी देवा झिंजाड यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी शिक्षक मेळावा होणार असून शिक्षण क्षेत्रातील सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मेजर प्रभाकर कुलकर्णी, शिवाजी तुपे, प्रा. दिलीप फडके, डॉ. गजानन खराटे, अनंत येवलेकर, मानस गाजरे, परशराम वाघेरे, प्रसाद पवार, के. एन. अहिरे, शिवाजी शिरसाठ, सी. बी. पवार, ललित तिळवणकर, अनिल ढोकणे, राजेश भुसारे, शहजाद हुसैन महम्मद यासिन, के. पी. रायते, संदीप देशपांडे, विश्वनाथ शिरोडे, भारती पवार, नंदलाल धांडे, मनिषा नलगे, राजेंद्र गिते यांचा समावेश आहे.