बारामती-दादर मार्गावर एसटीची वातानुकूलित शिवनेरी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्वारगेट मार्गाने सोडण्यात आली आहे. बारामती येथून सकाळी साडेसहा वाजता ही बस सोडण्यात येत आहे. मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर, स्वारगेट, चांदणी चौक, इंदिरा कॉलेज (वाकड), कळंबोली, कोकणभवन, नेरुळ फाटा, वाशी हायवे, मैत्री पार्क, चेंबूर या मार्गाने २५५ किलोमीटरचे अंतर सहा तासात पार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासात दादरहून दुपारी तीन वाजता ही गाडी सोडण्यात येते. रात्री नऊच्या सुमारास ती बारामती येथे पोहोचते. या गाडीच्या प्रवासासाठी ५९५ रुपये (प्रौढ) व ३०० रुपये (मुले) तिकीट आकारणी करण्यात येत आहे. स्वारगेट ते बारामती या प्रवासाठी २३५ रुपये प्रवासभाडे आहे. या सेवेचे ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
बारामती-दादर मार्गावरही आता एसटीची ‘शिवनेरी’
बारामती-दादर मार्गावर एसटीची वातानुकूलित शिवनेरी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्वारगेट मार्गाने सोडण्यात आली आहे. बारामती येथून सकाळी साडेसहा वाजता ही बस सोडण्यात येत आहे.
First published on: 13-11-2012 at 03:12 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivneri st bus going to start between baramati dadar