‘शिक्षण मंडळ कराड’ या नामवंत संस्थेच्या कार्यकारिणीची सभा होऊन त्यात कार्यकारिणी सचिवपदी डॉ. श्रीकांत गोविंद सबनीस व संयुक्त सचिवपदी मकरंद बाळकृष्ण महाजन यांची निवड करण्यात आली. २०१३ ते २०१७ या कालावधीसाठी या दोन्ही निवडी एकमताने झाल्या.  शिक्षण मंडळाचे आधारवड डॉ. रा. गो. प्रभुणे यांचे नुकतेच निधन झाल्याने रिक्त झालेल्या सचिवपदी डॉ. सबनीस यांची निवड झाली. या निवडीबद्दल मकरंद महाजन व डॉ. श्रीकांत सबनीस यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.