‘डीकेटीई’ महाविद्यालयाने वस्त्रोद्योगासाठी आवश्यक असणारे कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याचा प्रयत्न केला व त्याला यशही आले. आज देश-विदेशात अनेक नामवंत कंपन्यांमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी आहेत ते अभिमानाने महाविद्यालयाचे नाव सांगतात ही गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन माजी खासदार व डीकेटीइचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
‘डीकेटीई’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मुंबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग प्रदर्शनस्थळी झाला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. आवाडे बोलत होते. इटमाच्या सीमा श्रीवास्तव, माजी प्राचार्य डी. बी. आजगांवकर, संस्थेच्या सचिव सपना आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांची प्रमुख उपस्थित होती. भारतातील नामवंत कंपन्यांबरोबर चीन, अमेरिका, रशिया आदी देशातील विविध कंपन्यांमध्ये प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास हजेरी लावली होती. अनेक वर्षांनंतर मित्र भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. महाविद्यालयाची दाखविण्यात आलेली चित्रफित लक्षवेधी ठरली.
वस्त्रोद्योगात ‘डीकेटीई’ने भरीव काम केले आहे. त्याचे फलित म्हणून आमच्या इंडस्ट्रीजमध्ये प्रमुख पदावर या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अशा तज्ञ विद्यार्थ्यांची आम्हाला गरज असून त्यासाठी आमच्या इंडस्ट्रीजचे दरवाजे डीकेटीईसाठी नेहमी खुले असतील असे श्री. अईच म्हणाले. हा विद्यालयाचा गौरव करून अशा
इटमाचे अध्यक्ष बचकानेवाला यांनी डीकेटीई महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे नमूद केले. प्रकाश आवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या तपश्चर्येमुळे ‘डीकेटीई’ने यशाचे शिखर गाठले असल्याचे आवर्जुन सांगितले. यावेळी प्रा.डॉ. ए. आय. वासिफ, माजी विद्यार्थी प्रमुख धवल देसाई, ए.के. पाटील, श्री. चालुके, सुनील पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. आभार दीपक पाटील यांनी मानले.