राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मुंबईत गोंधळ उडेल, अशी चर्चा दक्षिण मुंबईतील नाक्यानाक्यावर सुरू झाली. आता दुकाने आणि वाहतूक बंद करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा नागरिकांचा अंदाज होता. पण सुदैवाने तो फोल ठरला. कुलाबा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल आदी परिसरात मनसेचे कार्यकर्ते औषधालाही दिसत नव्हते. मात्र राज यांना अटक केल्यानंतर काही दुकानदारांनी बंद केलेली दुकाने थोडय़ा वेळाने पुन्हा उघडली. तसेच अटकेबाबत चर्चा करणारी टाळकीही काही वेळाने आपापल्या कामाला निघून गेली आणि दक्षिण मुंबईतील दैनंदिन कारभार नियमितपणे सुरू झाला. जवळपास सर्वच कार्यकर्ते वाशी टोल नाक्यावर गेल्याने दक्षिण मुंबईत अटकेची प्रतिक्रिया उमटलीच नाही. दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्ते येतील, अशी भीती दुकानदारांना वाटत होती. परंतु कुणीच न फिरकल्याने दुकानदारांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
लालबाग-परळ बंद
टोलविरोधी आंदोलनाचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवरून सुरू असतानाच राज ठाकरे यांच्या अटकेचे वृत्त झळकताच त्याची प्रतिक्रिया लालबाग, परळ, दादर आदी परिसरात उमटली. काही ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी आवाहन करताच दुकानदारांनी दुकाने बंद केली. तर काही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद केली. रस्त्यावरील वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू होती. परंतु मनसेच्या आंदोलनाचा धसका घेऊन अनेकांनी आपली वाहने घरीच ठेऊन सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करणे पसंत केल्याचे दिसत होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
दक्षिण मुंबई सुरळीत
राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मुंबईत गोंधळ उडेल, अशी चर्चा दक्षिण मुंबईतील नाक्यानाक्यावर सुरू झाली.
First published on: 13-02-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South mumbai cleare