मोठी प्रतीक्षा यादी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कामाख्या ते पुणे दरम्यान २८ ते ३१ जुलैदरम्यान विशेष साप्ताहिक अतिजलद तर बिलासपूर ते बिकानेर दरम्यान ३१ जुलै ते १ नोव्हेंबर दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे गाडय़ा सोडल्या जाणार आहेत.  
कामाख्या ते पुणे ०२५१२ विशेष साप्ताहिक अतिजलद गाडी प्रत्येक सोमवारी २८ जुलै, ४,११ व १८ ऑगस्ट रोजी कामाख्याहून रात्री २२.४५ वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी प्रत्येक बुधवारी ३० जुलै, ५, १३, २० ऑगस्ट रोजी १०.५५ वाजता ती नागपूरला येईल. ११.०५ वाजता निघून ती वर्धा येथे१२.०२ वाजता पोहोचेल व १२.०५ वाजता रवाना होईल. बडनेरा येथे १३.४५ वाजता पोहोचून १३.५० वाजता निघेल. अकोला येथे १४.४५ वाजता पोहोचून १४.५० वाजता निघेल. भुसावळ येथे १६.३० वाजता पोहोचून १६.४० वाजता निघेल. पुणे येथे चवथ्या दिवशी प्रत्येक गुरुवारी पहाटे ०२.४५० वाजता पोहोचेल. पुणे ते ते कामाख्या ०२५११ साप्ताहिक विशेष अतिजलद गाडी प्रत्येक गुरुवारी ३१ जुलै, ७, १४ व २१ ऑगस्ट रोजी पुण्याहून सकाळी १०.४५वाजता निघेल. भुसावळला रात्री २० वाजता पोहोचून २०.१० वाजता निघेल. अकोला येथे रात्री २१.१५ वाजता पोहोचून २१.२० वाजता निघेल. बडनेरा येथे २३.१५ वाजता पोहोचून २३.२० वाजता निघेल. वर्धा येथे दुसऱ्या दिवशी प्रत्येक शुक्रवारी १, ८, १५ व २२ ऑगस्ट रोजी ०.३२ वाजता पोहोचून ०.३५ वाजता निघेल. नागपूरला सकाळी ०१.५५ पोहोचेल. ०२.०५ वाजता निघेल. कामाख्याला तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी १५.१५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाडय़ांना प्रत्येकी एकतृतीय वातानुकूलित, एकद्वितीय वातानुकूलित, सातशयनयान, चार सामान्य व दोन एसएलआर, असे एकूण पंधरा डबे राहतील. न्यू बोगाईगाव, नवी कुचबिहार, नवी जलपायगुडी, किशनगंज, मालदा टाऊन, रामपूर हाट, दुर्गापूर, आसनसोल, जयचंदीपहाड, पुरुलिया, चक्रधरपूर, राऊरकेला, झारसुगडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर व दौंड येथे या गाडय़ांचा थांबा राहील.   बिलासपूर ते बिकानेर दरम्यान ३१ जुलै ते १ नोव्हेंबर दरम्यान विशेष साप्ताहिक गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. बिलासपूर ते बिकानेर ०८२४५ साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक गुरुवारी ३१ जुलै, ७, १४, २१, २८ ऑगस्ट, ४, ११, १८, २५ सप्टेंबर, २, ९, १६, २३ व ३० ऑक्टोबरला बिलासपूरहून सायंकाळी १८.०५ वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी प्रत्येक शुक्रवारी ०१.१० वाजता ती नागपूरला येईल. ०१.४० वाजता निघून ती पांढुर्णा येथे०२.५३ वाजता पोहोचेल व ०२.५५ वाजता रवाना होईल. बिकानेर येथे तिसऱ्या दिवशी प्रत्येक शनिवारी पहाटे ०५.५० वाजता पोहोचेल. बिकानेर ते बिलासपूर ०८२४६ साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक शनिवारी २, ९, १६, २३, ३० ऑगस्ट, ६, १३, २०, २७ सप्टेंबर, ४, ११, १८, २५ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला बिकानेरहून रात्री २३.५९वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी प्रत्येक सोमवारी पांढुर्ना येथे ०२.४४ पोहोचेल. ०२.४६ वाजता निघेल. ती नागपूरला ०४.४० वाजता येईल. पहाटे ०५.१० वाजता निघून ती बिलासपूरला दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल.
या दोन्ही गाडय़ांना प्रत्येकी दोनद्वितीयवातानुकूलित, चारतृतीय वातानुकूलित, सहाशयनयान, असे एकूण बारा डबे राहतील. भाटापारा, रायपूर, भिलाई पॉवर हाऊस, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, पांढुर्णा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, सिहोर, शुजालपूर, बरछा, उज्जन, नागदा, श्यामगड, भवानी मंडी, कोटा, इंदरगड मंडी, सवाई माधोपूर, बनस्थली निवाई, दुर्गापुरा, जयपूर, फुलेरा, कुचामन सिटी, मकराना, देगाना, नागोर, नौखा व देश्नोके येथे या गाडय़ांचा थांबा राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special weekly train for bikaner and pune
First published on: 25-07-2014 at 12:41 IST