संगमनेरमधील लोकपंचायत संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. २८) महिलांवरील कौटुंबिक िहसाचार विरोधी ‘राज्यस्तरीय परिषद’ घेण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड या परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उल्हास पाटील यांनी दिली.
संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन मंत्री वर्षां गायकवाड व बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी संजीवकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते होणार आहे. समारोपासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ, महिला व बालकल्याण आयुक्त नंदकिशोर डहाळे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव देशमुख उपस्थित राहणार आहे.
राज्यस्तरीय परिषदेदरम्यान चर्चासत्रांचेही आयोजन संयोजकांनी केले आहे. उद्घाटनानंतर होणाऱ्या महिलांवरील कौटुंबिक िहसाचार रोखण्यासाठीच्या ‘कायद्याचा उपयोग आणि मर्यादा’ या विषयावरील चर्चासत्रात अ‍ॅड. अंजली पाटील, नूरजहाँ नियाझ, सुप्रिया बेनखेडे, हरीष सदानी, अ‍ॅड. मंगल हांडे, नंदकिशोर डहाळे, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी, अ‍ॅड. राम शेरमाळे सहभागी होणार आहेत. याचदरम्यान होणाऱ्या ‘वंचित एकटय़ा महिलांच्या पुनर्वसनाचे प्रश्न’ या विषयावरील दुसऱ्या चर्चासत्रात शिल्पा कशेळकर, मंगल िखवसरा, अप्सरा शेख, अ‍ॅड. ज्योती मालपाणी, मिलींद चव्हाण, पूनम केसकर आणि शालन शेळके सहभागी होणार असून परिषदेत राज्यात महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध संस्थांचे, संघटनांचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण तसेच संबंधित शासकीय विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.