समताप्रेमी नागरिकांच्या धम्मयात्रेत सेवादलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां सुधाताई वर्दे यांना समताभुषण तर ज्येष्ठ साहित्यिक हिराताई बनसोडे यांचा आज समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सुशिलाताई रुपवते यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दादासाहेब रुपवते फौंडेशन, पाली अध्ययन केंद्र, यशवंतराव भांगरे संशोधन केंद्र, बहुजन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विधमाने (स्व.) दादासाहेब रुपवते यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त भंडारदरा येथे धम्मयात्रा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात समताभुषण, समाजभूषण पूरस्कार प्रदान करण्यात आले.
हिराताई बनसोडे यावेळी बोलतांना म्हणाल्या, चार कविता आल्या हे मोठेपण आले असे नाही, तर या पुरस्काराने मला मोठेपण मिळवून दिले. महात्मा ज्योतीराव फूले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सन्मान मिळवून दिला. तोच वारसा प्रेमानंद रुपवते व स्नेहजा रुपवते चालवत आहेत. मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळातील भिमाची लेक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.मात्र बाबांच्या नावावर मोठे झाले, सवलती घेतल्या, पदव्या घेतल्या, आधिकारी झाले व बाबांना व घटनेला विसरले असे समाजात अनेकजण आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सूधाताई वर्दे म्हणाल्या, श्री कृष्णाने गीता धर्मग्रंथ सािंगतला, तर देशाचा धर्मग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला व सांगितलाही, मात्र देशातील राजकारणी घटनेप्रमाणे वागत नाही. बलत्कार वासनेपोटी नाही तर सुडबुध्दीने होतात. बलात्कारीत स्त्रीकडे तिरस्कार नजरेपेक्षा आपुलकीने पहा, देशात चोरी करणारा सापडतो पण बलात्कार करणारा सापडत नाही अशी खंत श्रीमती वर्दे यांनी व्यक्त केली.
सुरूवातीला सन्मानपत्राचे वाचन स्नेहजा रुपवते यांनी केले. स्वागत व प्रास्तविक प्रेमानंद रुपवते यांनी केल़े  कार्यक्रमापुर्वी भंडारदरा गावातून गौतमबुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब रुपवते यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अशोकराव भांगरे, लोकशाहीर लिलाधर हेगडे, रमेशचंद्र खांडगे आदी उपस्थित होते.