दिवाळीच्या निमित्ताने दुर्लक्षित किल्ल्यांची माहिती नागरिकांना देता यावी यासाठी काही मित्रमंडळे किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारीत आहेत. गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने रोहिडा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. भोरजवळचा हा किल्ला शिवाजी महाराजांनी कृष्णाजी बांदल देशमुखांकडून जिंकून घेतला होता. बांदल यांचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे यांना महाराजांनी स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले होते. गणेश ओरसे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बढे, संजय आदवडे, रवींद्र व्हावळ, मुकेश खामकर, पराग कानिटकर, राजू मापुसकर, मिलिंद येद्रे, मिलिंद वरखेडकर, अक्षय माने यांनी हा किल्ला उभारला आहे.