एलबीटी कराला विरोध दर्शवीत शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी थाळीनाद मोर्चा काढला. तर उद्या सायंकाळी दसरा चौकात मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.
स्थानिक संस्था कराच्या विरोधात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी संघटितरीत्या आंदोलन सुरू केले आहे. आजच्या सहाव्या दिवशीही शहरातील दुकाने बंद होती. व्यापारी महासंघाच्या वतीने एलबीटीच्या विरोधात दररोज वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. याअंतर्गत गुरुवारी टाऊन हॉल बागेतून थाळीनाद मोर्चा काढला. भाऊसिंगजी रोड, महापालिका, गुजरी लाईन मार्गे फिरून मोर्चा पुन्हा टाऊन हॉल बागेत आला. तेथे मोर्चा विसर्जित करण्यात आला. या आंदोलनात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, अमर क्षीरसागर, दुर्गेश लिंग्रज, संदीप वीर, प्रीतेश कर्नावट, महेश मनचुडिया, सचिन शहा, जयंत गोमाणी, अमित नष्टे आदी सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2013 रोजी प्रकाशित
एलबीटी’च्या विरोधात कोल्हापुरात थाळीनाद मोर्चा
एलबीटी कराला विरोध दर्शवीत शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी थाळीनाद मोर्चा काढला. तर उद्या सायंकाळी दसरा चौकात मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.
First published on: 17-05-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thalinad morcha against lbt in kolhapur