‘ते’ रात्रीच्या वेळी फिरून शोभेच्या दागिन्यांचे कारखाने हेरत असत. मग रात्री उशीरा शटर तोडून आतील कच्चा माल लंपास करीत. हे शोभेचे दागिने भंगारवाल्याला विकून पैसे कमवायचे. अनेक महिने त्यांचा हा प्रकार सुरू होता. त्यातून त्यांनी हजारो रुपये कमावले. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे भांडे फोडले. या प्रकरणी काळू हसवले याला सुरुवातीला माहीम येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. आमची पाचजणांची टोळी असल्याचे काळूने पोलिसांना सांगितले. काळूच्या मालकीचा टेम्पो असून चोरीसाठी त्याचाच वापर केला जात असे. शोभेच्या दागिन्यांच्या कारखान्यातील कच्चा माल ते चोरत असत.