कुटुंबातील आजारी व्यक्तीला जेवणाचा डबा देऊन घरी परतत असतांना साक्री तालुक्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील हिरवाडे गावाच्या फाटय़ाजवळ मोटारसायकलला झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तिघेही तालुक्यातील मालनगाव येथील रहिवासी आहेत. सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही घडना घडली.
अनिल अर्जुन साई (३०), छोटू अर्जुन साई (३५) आणि छोटू माधव मालछे (३५), हे तिघे साक्रीला जेवणाचा डबा देऊन मोटारसालकलवरुन घरी परत येत होते. नागपूर-सुरत महामार्गावरील हिरवाडे फाटय़ाजवळ सुरतकडून येणाऱ्या आयसर टेम्पोने एका झाडाला धडक दिली. त्यानंतर टेम्पो समोरुन येणाऱ्या मोटारसालकलवर आदळला. या अपघातात मोटारसायकल वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. साक्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहेत.