इचलकरंजी शहर हागणदारीमुक्त व सुंदर करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून घर तेथे शौचालय योजना हाती घेतली आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत कमी खर्चाच्या स्वच्छता योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेसाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्याच्या अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर झालेला आहे. २ कोटी ६२ लाख अनुदानाची रक्कम नगरपरिषदेस लवकर प्राप्त होणार असून त्याचा लाभ २८५८ लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली आहे.
इचलकरंजी स्वच्छ व सुंदर करण्याबरोबर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून घर तेथे शौचालय योजना राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या संदर्भात पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी मुंबई येथे बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सदरचा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी शासनाला सादर केला होता.
राज्य समन्वय समितीच्या बैठकीत इचलकरंजीसह कागल, रत्नागिरी, चंद्रपूर, विटा, सावनेर, रहिमतपुर, काटोल आदी नगरपरिषदांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती.
यापूर्वी केंद्र शासनाच्या हिश्श्याचे २५ टक्के तर राज्य शासनाच्या हिश्श्याचे ५० टक्के असे एकूण १ कोटी ७ लाख १ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. त्यानुसार इचलकरंजीतील एकूण ४०४७ लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात ११८९ लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.
आता याच योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्याच्या उर्वरित अनुदानास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या हिश्श्याची ७५ टक्के म्हणजे २ कोटी ३१ लाख ४३ हजार ७८१ रूपये तर राज्य शासनाच्या हिश्श्याची ५० टक्के म्हणजे ३० लाख ८५ हजार ८३८ रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
या अनुदानाची एकूण रक्कम २९ हजार ६१९ इतकी रक्कम लवकरच नगरपरिषदेला प्राप्त होणार असून त्याचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळणार आहे. या कामी माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, आरोग्य समिती सभापती जहाँगिर पटेकरी, मुख्याधिकारी नितीन देसाई आदींचे सहकार्य लाभल्याचेही श्री. आवाडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
इचलकरंजीत घर तेथे शौचालय योजना
इचलकरंजी शहर हागणदारीमुक्त व सुंदर करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून घर तेथे शौचालय योजना हाती घेतली आहे. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत कमी खर्चाच्या स्वच्छता योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेसाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्याच्या अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर झालेला आहे.
First published on: 25-11-2012 at 01:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toilet at home scheme in ichalkaranji