लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ असलेल्या पादचारी पुलाच्या उभारणीसाठी शुक्रवारी (३ मे) मध्यरात्रीपासून शनिवार (४ मे) पहाटेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येणार असल्याने काही मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दोन ते पाच या फलाटांच्या वर पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार मध्यरात्री ११ वाजल्यापासून शनिवार पहाटे ६.१५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे शनिवारी पहाटे ६.३५ वाजता सुटणारी गोरखपूर एक्स्प्रेस ७.३५ वाजता सुटेल तर अमृतसरहून येणारी एक्स्प्रेस घाटकोपर येथे थांबवून लोकमान्य टिळक टर्मिनसला दीड तास उशीराने येईल. तर दरभंगा येथून येणारी कर्मभूमी एक्स्प्रेस भांडूप येथे थांबवून नंतर ४० मिनिटे उशीराने टर्मिनसला येईल, असे सूत्रांनी सांगितले.