जवाहरलाल नेहरू बंदरामुळे अवजड वाहतुकीचे आगार बनलेल्या उरण तसेच आसपासच्या परिसरात पुरेशा नियोजनाअभावी अपघातांचे प्रमाण वाढीस लागले असून गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये ५५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना भरधाव येणाऱ्या अवजड कंटेनरने जोरदार धडक देत चिरडले होते. यापकी जसखार येथील दोन तरुणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता, तर दोन जखमींपकी एकजण मृत्यूशी झुंज देत आहे.
उरण परिसरातील अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे होणाऱ्या अपघातांचीही संख्या वाढली आहे. आतापर्यंत  झालेल्या २६५ अपघातात ५५ पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अवजड वाहतुकीमुळे प्रवशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
अवजड वाहनांच्या बेदरकार कारभारामुळे अपघातातील बळी व जखमींचीही संख्या वाढू लागली आहे. उरण सामाजिक संघटनेने वारंवार सिडको आणि जेएनपीटीसह वाहतूक विभागाकडेही अपघातातील जखमी व बळींना आíथक सहकार्य करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असून उरण व जेएनपीटी परिसरातील अपघातांची दखल कोण घेणार, असा सवाल आता येथील जनतेकडून केला जात आहे.
जेएनपीटी बंदर परिसर तसेच उरण-पनवेल रस्त्यावरील अपघातात मागील दोन वर्षांत ५५ जणांचे बळी गेले आहेत.
जखमींचा आकडा शंभरपेक्षा अधिक आहे. हे अपघात टाळण्यासाठीही वाहतूक शाखा, जेएनपीटी तसेच सिडकोने संयुक्त आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran jnpt area becomes trap of accidents
First published on: 29-01-2014 at 08:04 IST