भारतरत्न जाहीर झालेले भाजपचे नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ९० वा वाढदिवस भाजपच्या वतीने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. स्वच्छता अभियान, ग्रामीण रूग्णालयांमध्ये फळवाटप, व्याख्यान, मोफत नेत्र चिकीत्सा शिबीर असे कार्यक्रम राबविण्यात आले.शहरातील गोळे कॉलनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रा. सुहास फरांदे, भारती बागूल, अलका जांभेकर आदींसह वॉर्डातील नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला. त्यानंतर भाजप सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाडमध्ये सदस्यता नोंदणी
मनमाडमध्ये वाजपेयी यांच्याबरोबरच खा. हरिश्चंद चव्हाण यांच्या ६४ व्या जन्मदिनानिमित्त मनमाड शहर भाजप मंडलातर्फे विविध कार्यक्रम झाले. भाजप सदस्य नोंदणी महाअभियानाची सुरूवात जिल्हा उपाध्यक्ष व नोंदणी समन्वयक नितीन पांडे, भाजप शहराध्यक्ष नारायण पवार यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आली. ७७४ सदस्यांची नोंदणी येथे करण्यात आली.
मनमाड भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ स्वच्छता करण्यात आली. मनमाड शहर व ग्रामीण रुग्णालयातील ४० रुग्णांना फळ वाटप ज्येष्ठ सदस्य रंगनाथ किर्तने, सुभाष संकलेचा, बाळासाहेब गटणे व देविदास चांदवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष सतीश परदेशी यांच्या सहकार्याने स्नेहभोजन देण्यात आले. मनमाड शहर मंडलच्या सावरकर नगर, संभाजी नगर, शिवाजीनगर, हुडको या विभागीय संपर्क कार्यालयांचे उद्घाटन नितीन पांडे व नारायण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छता मोहीम व आनंदोत्सव
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस व भारतरत्न जाहीर झाल्याचा आनंदोत्सव यानिमित्त नाशिक येथील प्रभाग क्रमांक
३९ मध्ये स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पूर्वविभाग सभापती कुणाल वाघ तसेच सुरेश पाटील, पवन भगूरकर, सुजाता करजगीकर आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबीर
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. २४ मधील राका कॉलनी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन भाजप आणि अयोध्या युवा मंचच्या वतीने करण्यात आले. जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने आयोजित या शिबीराचे उद्घाटन आ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीराचे आयोजन अयोध्या युवा मंचचे अध्यक्ष धनंजय पुरोहित यांनी केले. यावेळी भाजयुमोचे प्रदेश चिटणीस अजिंक्य साने, मंडल सरचिटणीस देवदत्त जोशी, अर्जुन घोटेकर, निखील जैन, रवींद्र घोटेकर, निखील उगले, चैतन्य चंद्रात्रे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vajpayee birthday celebrated with various programs
First published on: 27-12-2014 at 01:10 IST