पेठ तालुक्यातील कळमपाडय़ासारख्या ग्रामीण भागात शहरातील विद्यार्थी ग्राम विकासास कशा प्रकारे मदत करू शकतात हे येथील डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड काम्प्युटर स्टडीज आणि वनवासी कल्याण आश्रम, वन विभाग यांनी श्रम शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
कळमपाडा येथील शिबीरामध्ये ९० विद्यार्थ्यांसह १३० जणांनी सहभाग घेतला. जिल्ह्य़ातील वनवासी भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. नियोजनशून्य आणि अर्निबध वाढीमुळे शहरात पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. वनवासी भागातील पाणी प्रश्न कोणत्या ना कोणत्या मार्गाने सतत गाजत असतो. परंतु तरीही या प्रश्नांकडे गांभिर्याने बघितले जात नाही. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराची पूर्वतयारी म्हणून आठवडाभर आधी या भागातील समस्या आणि त्यांची उत्तरं या अर्थाने महाविद्यालयात वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत संघटन मंत्री संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी वनवासींचे देशातील विकासात असलेले योगदान आणि सद्यस्थिती या अनुषंगाने मांडणी केली. संपूर्णपणे विद्यार्थ्यांनी नियोजन केलेला या उपक्रमाचे विद्यार्थी समन्वक म्हणून रोशन शिर्के आणि संजना बोन्दार्डे यांनी काम पाहिले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
श्रमदान शिबिरातून विद्यार्थ्यांचे ग्राम विकासात योगदान
पेठ तालुक्यातील कळमपाडय़ासारख्या ग्रामीण भागात शहरातील विद्यार्थी ग्राम विकासास कशा प्रकारे मदत करू शकतात हे येथील डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड काम्प्युटर स्टडीज आणि वनवासी कल्याण आश्रम, वन विभाग यांनी श्रम शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
First published on: 05-02-2014 at 09:20 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village development contributions