बालिकाश्रम रस्त्याच्या कामाची मुदत १५ महिन्यांची आहे, मात्र नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हे काम ७ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्यास ठेकेदार संस्थेला सांगितले असल्याची माहिती आमदार अनिल राठोड यांनी रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
आमदार राठोड, आमदार राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालिकाश्रम रस्त्याच्या कामाला बुधवारी सायंकाळी सुरूवात करण्यात आली. र्मचट बँकेचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार शिंदे यांचेही यावेळी भाषण झाले.
महापौर शीला शिंदे यांनी मनपाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हास्तरीय योजनेतून शहरातील २२ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमहापौर गीतांजली काळे यांनी महापौर व उपमहापौर अशी दोन्ही महत्वाची पदे महिलांकडे असल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले व नागरिकांचे महानगराचे स्वप्न पूर्ण करणे
हेच ध्येय असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांनी रस्त्याच्या कामाकडे नागरिकांनीही
लक्ष द्यावे, असे आवाहन
केले.
अध्यक्षीय भाषणात मुनोत यांनी मनपाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले, मात्र शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून त्याबाबतीत मनपाने कार्यक्षमतेने काम करावे, अशी सूचना केली. स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक संभाजी कदम आदींनी मनोगत व्यक्त
केले.
कार्यक्रमाला उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, सभागृह नेते अशोक बडे, महिला बाल कल्याण समिती सभापती किरण उनवणे, उपसभापती मालनताई ढोणे, स्थानिक नगरसेवक, तसेच सेना-भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगरसेवक संजय चोपडा यांनी आभार मानले.