वाई औद्योगिक वसाहतीतील चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीतील काम करणाऱ्या तीन परप्रांतीय कामगारांना दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने आत घुसून जबर मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.
स्विटेला इंडेक्स प्रा. लि. या चॉकलेट तयार करणाऱ्या अमित दोखीलाल सरोज, विनोद सुखलाल सरोज, हमीद दोखीलाल सरोज व भूजा मोहन सरोज हे काम करीत असताना रविवारी रात्री आठच्या सुमारास १५ ते ३० वयोगटातील दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने कंपनीत घुसून लाथा- बुक्क्य़ांनी,काठय़ांनी जबर मारहाण केली. कंपनीतील काचा, टीव्ही फोडून टाकल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अज्ञातांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.