ध्यान हे आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा काही वेगळे नसते’, असे दार्शनिक जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे. दैनंदिन जीवनात ध्यानाचे स्थान काय आहे, त्याचा दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो, ध्यान करताना कोणत्या अडचणी येतात, अशा प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्टतर्फे नाशिक येथे १४ ते १८ डिसेंबर दरम्यान एक शिबीर (कार्यशाळा) आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये मराठी भाषेमध्ये आदानप्रदान होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – किशोर खैरनार ९८२२६००५४१ / इ-मेल –  keducationtrust@gmail.com