जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा नियोजन सभागृहात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. . कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले अप्पर जिल्हाधिकारी गुलाब खरात यांनी आपल्या भाषणाची सुरूवात ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ या कवी प्रदीप यांच्या गीताने केली..
 संपूर्ण उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना फुलविणाऱ्या भाषणात खरात यांनी ध्वजदिन निधीसाठी सढत हाताने मदत करण्याचे आवाहन केले. तसेच  देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता सैनिक निधडय़ा छातीने लढत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून तरुणांनी देशसेवेसाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. माजी सैनिक अथवा त्याचे कुटुंब यांचे कोणतेही प्रश्न अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी उपस्थित होते.  प्रास्तविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी केले.ध्वजनिधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.