सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते झुणका-भाकर केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील होते मंडलिक म्हणाले, सर्वसामान्य घटकांचे हित डोळय़ांसमोर ठेवून अवघ्या दहा वर्षांत कारखाना कर्जमुक्त करण्यात यश आले. कारखान्याचे सातत्याने उच्चांकी ऊसदर देताना आधुनिकीकरण व सहवीज प्रकल्पाचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सभासद व कामगारांसाठी अपघाती विमा योजना, साखर शाळा, ठिबक सिंचन योजना, शैक्षणिक संकुल उभारणी यांसारख्या कारखान्याच्या विविध घटकांच्या हिताच्या योजना यशस्वीपणे राबवत आहोत. भविष्यात कारखान्याच्या वतीने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असेल. झुणका-भाकर ही त्यातील महत्त्वाची योजना असल्याने याचा लाभ ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार, वाहतूकदार व तोडणी कामगारांना होणार आहे. हा उपक्रम ‘ना नफा ना तोटा तत्त्वा’वर यशस्वीपणे चालेल. या वेळी सर्व संचालक, एन. वाय. पाटील, आर. बी. बोंगार्डे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी केले. आभार ज्येष्ठ संचालक प्रा. एन. एस. चौगले यांनी मानले.