फुटबॉल सामन्यांसाठी रेल्वेने होणाऱ्या प्रवासात ते पी. जी. वुडहाऊस आणि सॉमरसेट मॉम आवडीने वाचत. फुटबॉलइतकेच क्रिकेटमध्येही नैपुण्य. परत टेनिसही खेळायचे आणि कॅरमसारख्या बैठय़ा खेळातही दबदबा. भारत हा क्रीडा संस्कृती रुजलेला देश नाही या विधानाला एक आणि एकच खणखणीत अपवाद म्हणजे.. सुबीमल ‘चुनी’ गोस्वामी.

एक निष्णात फुटबॉलपटू ही त्यांची मुख्य ओळख. पण ते बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले. गत शतकात या दोन्ही खेळांमध्ये कर्तृत्व गाजवलेले दोनच खेळाडू. एक चुनी गोस्वामी आणि दुसरा इंग्लंडचा गॅरी लिनेकर. चुनी गोस्वामी यांच्या फुटबॉलमध्ये पारंपरिक सौंदर्यस्थळे होती. लहान चणी, चपळ वावर आणि पदलालित्य! शिवाय गोल करण्यासाठी अत्यावश्यक असलेली चलाखी. प्रतिस्पर्धी प्रशिक्षकांकडून नेहमी सावधगिरीचा सल्ला दिला जायचा.. ‘त्याच्या पायांकडे नका बघत राहू. फसलात म्हणून समजा. त्याऐवजी फुटबॉलवर नजर ठेवा. गोल तरी वाचेल’! चुनी गोस्वामी हे भारताचे सर्वाधिक परिचित फुटबॉलपटू. महिन्याभरापूर्वीच पी. के. बॅनर्जी हे आणखी एक महान फुटबॉलपटू निवर्तले. त्यांच्यापाठोपाठ आता चुनी गोस्वामींचेही निधन झाल्यामुळे भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगातील आणखी एक दुवा निखळला. १९५८ ते १९६४ या काळात चुनी गोस्वामी भारताकडून खेळले. ३६ सामन्यांमध्ये १३ गोल ही त्यांची निव्वळ गोलकमाई. परंतु त्या काळात भारताचा दबदबा क्रिकेटच्याही आधी फुटबॉलमध्ये होता. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताचा बलाढय़ हंगेरीकडून निसटता पराभव झाला होता. पण १९६२च्या एशियाडमध्ये चुनी गोस्वामींच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदक जिंकले. चुनी गोस्वामी, पी. के. बॅनर्जी आणि तुलसीदास बलराम हे त्रिकूट म्हणजे त्यावेळच्या भारतीय फुटबॉल संघाचे इंजिन होते. या तिघांच्या जोरावर भारताने काही महत्त्वाचे सामने जिंकले. कोलकात्याच्या मोहन बागानकडून ते सुरुवातीपासून अखेपर्यंत खेळले. व्यावसायिकतेपेक्षा निष्ठेला महत्त्व असण्याचा तो काळ. त्यांचे किस्से अनेक. एकदा राष्ट्रीय संघाच्या सरावासाठी ते उशिरा पोहोचले. त्याबद्दल एका सहकाऱ्याने तत्कालीन प्रशिक्षक सईद रहीम यांच्याकडे तक्रार केली. रहीम उत्तरले, ‘त्याच्यासारखा खेळून दाखव. मग तूही उशिरा ये’!

sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस

फुटबॉलनंतर ते क्रिकेटकडे वळले. भारताकडून नाही खेळू शकले, कारण उमेदीची वर्षे फुटबॉलमध्ये व्यतीत झाली होती. तरीही बंगालसारख्या चांगल्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करण्याइतपत गुणवत्ता त्यांच्याकडे होती. रॉय गिलख्रिस्ट यांच्यासारख्या खतरनाक गोलंदाजासमोर त्यांनी एका प्रथम श्रेणी सामन्यात केलेल्या ४४ धावा आजही चर्चिल्या जातात. त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर एकदा मध्य आणि पूर्व विभागाच्या संयुक्त संघाने गॅरी सोबर्स यांच्या वेस्ट इंडिज संघाला धूळ चारली होती. खेळपट्टी, साइट स्क्रीन वगैरे बाबींची त्यांनी कधीही तमा बाळगली नाही. २२ खेळाडूंसाठी परिस्थिती सारखीच आहे, तेव्हा तक्रार कशासाठी असा त्यांचा साधा सवाल असायचा.

.. हा असा रोकडा साधेपणा हल्ली कुठे आढळतो?