देशातील सर्वात मोठा दुचाकी सेगमेंट हा कम्युटर म्हणजेच एंट्री लेव्हल मोटरसायकलचा आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिरो मोटोकॉर्प आघाडीवर असून, त्यानंतर अन्य कंपन्यांच्या मोटरसायकली आहेत. अर्थात, प्रत्येक मोटरसायकल कंपनीने कम्युटर सेगमेंटमध्ये आपला हिस्सा वाढविण्यासाठी व आहे तो टिकविण्यासाठी सातत्याने नवे मॉडेल आणणे व त्यात अपग्रेडेशन करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळेच आपण मागील कॉलममध्ये बजाज ऑटोने कम्युटर मोटरसायकल प्लॅटिनामध्ये केलेले बदल व अन्य फीचरविषयी माहिती घेतली. टीव्हीएस मोटरही या सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांपासून असून, कंपनीच्या काही मोटरसायकलनी स्वत:चे असे एक स्थान मिळविले आहे.

फीचर्स कोणती आहेत – कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये बजेटवर भर देणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा खूप असतात. ग्राहकांना चांगली फीचर्स, मायलेज एफिशियंट, आरामदायी सफर व स्मूथ इंजिन हवे असते. त्यामुळेच रास्त किमतीत ही फीचर बसविण्यासाठी कंपन्यांना तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात आर अ‍ॅण्ड डी म्हणजेच संशोधन व विकासावर भर द्यवा लागतो. टीव्हीएस मोटरची स्टार सिटी ही मोटरसायकल तशी जुनी असली तरी या मोटरसायकलमध्ये वॉव फॅक्टर आणण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. त्यामुळेच स्टार सिटीचे स्टार सिटी प्लस हे कम्युटर सेगमेंटमध्ये प्रीमियम फील देणार आहे. मोटरसायकल पाहिल्यावरच पहिल्याक्षणी कंपनीने ग्राहकांना खरेच चांगले काही तरी देण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. मोटरसायकलसाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टिकची गुणवत्ता व त्याला दिलेल्या रंगाचे फिनिशिंग फारच छान आहे. काही वेळा कॉस्ट कटिंगसाठी मोटरसायकलच्या बटन्सची गुणवत्ता चांगली दिली जात नाही. मात्र, स्टार सिटी प्लसला दिलेली बटन्सदेखील चांगल्या दर्जाची आहेत. बहुतेक प्रीमियम मोटरसायकलमध्ये सेमी डिजिटल टेक्नोमीटर असतो. कंपनीने स्टार सिटी प्लसमध्ये असा टेक्नोमीटर दिला असून, त्याता फ्यूएल इंडिकेटरही आहे. इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकलचा वेग आहे का नाही हे कळण्यासाठी ग्रीन व रेड लाइट दिला आहे. यामुळे टॉर्क वाढविल्यावर मोटसायकल रेड लाइट लागतो. यावरून मोटरसायकल इकॉनॉमी मोडमध्ये चालत नाही, असे समजते. त्यामुळेच मोटरसायकल इकॉनॉमी मोडमध्ये कशी राहील हे आपल्या हातात आहे. अधिक प्रमाणात इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकल चालविल्यास त्याचा फायदा हा मायलेज वाढत्यात म्हणजे बचत होण्यात होतो. अनेक वेळा सव्‍‌र्हिसिंगला मोटरसायकल कधी द्ययची, हे सातत्याने आपल्याला पाहावे लागते. स्टार सिटी प्लसमध्ये सव्‍‌र्हिस इंडिकेटर दिला आहे. हे फीचर प्रीमियम मोटरसायलमध्ये दिले जाते.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

इंजिन व मायलेज – पूर्वी एंट्री लेव्हल मोटरसायकल या फक्त स्पोक व्हीलमध्येच यायच्या. मात्र, स्पर्धेमुळे ग्राहकांना अधिकाधिक देण्यासाठी कंपन्यांनी सातत्याने झटत आहेत. त्यामुळे बहुतेक कम्युटर मोटरसायकलमध्ये मॅग व्हील, रिअल मॅग ग्रॅब रेल, क्लीअर लेन्स इंडिकेटर, पास लाइट्स, बटन स्टार्ट, एलईडी टेल लॅम्प फीचर दिली जात आहेत. स्टार सिटी प्लस याला अपवाद नाही. कंपनीने पुढील बाजूस टेलिस्कोपिक व मागील बाजूस फाइव्ह स्टेप अ‍ॅडजेस्टेबल सस्पेन्शन दिले आहे. तसेच, मोटरसायकलचे सीट मोठे व आरामदायी आहे आणि याची रचना रायडर फ्रेंडली असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासात मोटरसायकलचा फटिक जाणवत नाही. कम्युटर सेगमेंटची मोटरसायकल असल्याने ८.३ पीएसचे ११० सीसीचे इंजिन आहे. मोटरसायकल ताशी पन्नास ते साठ किमीच्या वेगाने चालविताना इंजिनची कामगिरी दमदार मिळत असल्याचे जाणवते. व्हायब्रेशनही वा आवाजही फारसा नाही. ही मोटरसायकल ताशी नव्वद किमीच्या वेगाने चालविता येऊ  शकते. मात्र, ताशी साठ किमीच्या पुढे वेग गेल्यावर इंजिनचा आवाज येऊ  शकतो. पण, कम्युटर मोटरसायकल ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामात प्रवास करण्यासाठी तयार केलेली आहे. तिचा हेतू रेसिंग नसून, कम्युटिंग आहे. त्यामुळे इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकल चालवावी. यामुळे एकूणच मोटरसायकलची कामगिरी चांगली राहील. कम्युटर सेगमेंटमधील मोटरसायकल प्रति लिटर ८० किमीपेक्षा अधिक मायलेज देतात, असा दावा कंपन्यांकडून केला जातो. मात्र, रस्ते, ट्रॅफिक, इंधन गुणवत्ता व चालविण्याची पद्धत यावर मोटरसायकलचे मायलेज अवलंबून असते. कम्युटर मोटरसायकल साधारण प्रति लिटर ५५ ते ६५ किमीचे मायलेज देऊ  शकते. अर्थात, याला अपवाद असू शकतो. एकूण विचार करता म्हणजे स्टाइल, लुक, कम्फर्ट, मालेज, किंमत याबाबत स्टार सिटी प्लस व्हॅल्यू फॉर मनी आहे.

पण, मोटरसायकल घेण्यापूर्वी तुम्हीही या सेगमेंटमधील स्प्लेंडर प्लस, प्लॅटिना, ड्रीम युगा चालवून मग आपला निर्णय घ्या.

ओंकार भिडे obhide@gmail.com