देशातील सर्वात मोठा दुचाकी सेगमेंट हा कम्युटर म्हणजेच एंट्री लेव्हल मोटरसायकलचा आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिरो मोटोकॉर्प आघाडीवर असून, त्यानंतर अन्य कंपन्यांच्या मोटरसायकली आहेत. अर्थात, प्रत्येक मोटरसायकल कंपनीने कम्युटर सेगमेंटमध्ये आपला हिस्सा वाढविण्यासाठी व आहे तो टिकविण्यासाठी सातत्याने नवे मॉडेल आणणे व त्यात अपग्रेडेशन करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळेच आपण मागील कॉलममध्ये बजाज ऑटोने कम्युटर मोटरसायकल प्लॅटिनामध्ये केलेले बदल व अन्य फीचरविषयी माहिती घेतली. टीव्हीएस मोटरही या सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांपासून असून, कंपनीच्या काही मोटरसायकलनी स्वत:चे असे एक स्थान मिळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स कोणती आहेत – कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये बजेटवर भर देणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा खूप असतात. ग्राहकांना चांगली फीचर्स, मायलेज एफिशियंट, आरामदायी सफर व स्मूथ इंजिन हवे असते. त्यामुळेच रास्त किमतीत ही फीचर बसविण्यासाठी कंपन्यांना तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात आर अ‍ॅण्ड डी म्हणजेच संशोधन व विकासावर भर द्यवा लागतो. टीव्हीएस मोटरची स्टार सिटी ही मोटरसायकल तशी जुनी असली तरी या मोटरसायकलमध्ये वॉव फॅक्टर आणण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. त्यामुळेच स्टार सिटीचे स्टार सिटी प्लस हे कम्युटर सेगमेंटमध्ये प्रीमियम फील देणार आहे. मोटरसायकल पाहिल्यावरच पहिल्याक्षणी कंपनीने ग्राहकांना खरेच चांगले काही तरी देण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. मोटरसायकलसाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टिकची गुणवत्ता व त्याला दिलेल्या रंगाचे फिनिशिंग फारच छान आहे. काही वेळा कॉस्ट कटिंगसाठी मोटरसायकलच्या बटन्सची गुणवत्ता चांगली दिली जात नाही. मात्र, स्टार सिटी प्लसला दिलेली बटन्सदेखील चांगल्या दर्जाची आहेत. बहुतेक प्रीमियम मोटरसायकलमध्ये सेमी डिजिटल टेक्नोमीटर असतो. कंपनीने स्टार सिटी प्लसमध्ये असा टेक्नोमीटर दिला असून, त्याता फ्यूएल इंडिकेटरही आहे. इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकलचा वेग आहे का नाही हे कळण्यासाठी ग्रीन व रेड लाइट दिला आहे. यामुळे टॉर्क वाढविल्यावर मोटसायकल रेड लाइट लागतो. यावरून मोटरसायकल इकॉनॉमी मोडमध्ये चालत नाही, असे समजते. त्यामुळेच मोटरसायकल इकॉनॉमी मोडमध्ये कशी राहील हे आपल्या हातात आहे. अधिक प्रमाणात इकॉनॉमी मोडमध्ये मोटरसायकल चालविल्यास त्याचा फायदा हा मायलेज वाढत्यात म्हणजे बचत होण्यात होतो. अनेक वेळा सव्‍‌र्हिसिंगला मोटरसायकल कधी द्ययची, हे सातत्याने आपल्याला पाहावे लागते. स्टार सिटी प्लसमध्ये सव्‍‌र्हिस इंडिकेटर दिला आहे. हे फीचर प्रीमियम मोटरसायलमध्ये दिले जाते.

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs star city plus features reviews
First published on: 03-11-2017 at 03:52 IST