World’s youngest billionaire List By Forbes: अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत २०२४ मध्ये १९ वर्षीय ब्राझिलियन विद्यार्थिनीने जगातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून स्थान पटकावले आहे. तिच्यापेक्षा फक्त दोन महिन्यांनी मोठ्या असलेला इटालियन तरुण क्लेमेंटे डेल वेचिओ आजवर सर्वात कमी वयाचा अब्जाधीश होता पण आता ही ओळख लिव्हिया व्होग्ट हिला प्राप्त झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Livia Voigt कोण आहे?

लिव्हिया व्होग्ट ही लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मोटर्स उत्पादकांपैकी एका कुटुंबाची वारस आहे. तिचे आजोबा वर्नर रिकार्डो वोइग्ट यांनी सह-स्थापित केलेल्या WEG मधील ती सर्वात मोठी वैयक्तिक शेअरहोल्डर आहे. सध्या विद्यापीठात शिक्षण घेत असणारी लिव्हिया व्होग्ट अद्याप कंपनीच्या बोर्डाचा भाग नाही असे फोर्ब्सने अहवालात नमूद केले आहे. लिव्हीयाची एकूण संपत्ती १.१ अब्ज अमेरिकन डॉलर (९१, ६१, १६,३०,००० भारतीय रुपये) इतकी आहे.

तिची मोठी बहीण, डोरा व्होईग्ट डी ॲसिस, या वर्षी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या २५ सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये जोडलेल्या सात नवीन नावांपैकी एक आहे. २६ वर्षीय तरुणीची एकूण संपत्ती १.१ अब्ज अमेरिकन डॉलर आहे, डोरा हिने २०२० मध्ये आर्किटेक्चरची पदवी मिळवली होती.

Clemente Del Vecchio कोण आहे?

तर सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या क्लेमेंटे डेल वेचियोकडे लिव्हिया व्होग्टपेक्षा जास्त मालमत्ता आहे, त्याची एकूण संपत्ती ४. ८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. क्लेमेंटे हा लिओनार्डो डेल वेचियो यांचा मुलगा आहे, जे ‘EssilorLuxottica’ या जगातील सर्वात मोठ्या चष्म्याच्या कंपनीचे मालक होते. लिओनार्डो हे स्वतः सुद्धा युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, त्यांचे २०२२ मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर क्लेमेंटेला त्याच्या वडिलांच्या कंपनीत १२.५ टक्के भागभांडवल मिळाले.

क्लेमेंटे हा लिओनार्डो डेल वेचिओच्या सहा मुलांपैकी एक आहे, त्यांच्या चष्मा कंपनीकडे रे-बॅन आणि ओकले सारख्या टॉप आयवेअर ब्रँडची मालकी आहे. लिओनार्डो यांचे वडिलांचे तीनदा लग्न झाले होते आणि क्लेमेंटे हा त्यांच्या तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. इटलीतील मिलान येथे क्लेमेंटे वास्तव्यास असतो.

हे ही वाचा<< रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश

भारतात, यावर्षी फोर्ब्सच्या श्रीमंत यादीतील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये झेरोधाचे संस्थापक नितीन (४७० कोटी अमेरिकन डॉलर्स) आणि निखिल कामथ (३१० कोटी अमेरिकन डॉलर्स) आणि फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन (१२० कोटी डॉलर्स) आणि बिन्नी बन्सल (१४० कोटी डॉलर्स) यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 years old girl student livia voigt becomes world youngest billionaire net worth over 1 billion who are indian young billionaire zerodha chdc svs
First published on: 05-04-2024 at 16:15 IST