गुल पनाग, अभिनेत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच मी ‘सोनी लिव्ह’ साठी ‘गुड बॅड गर्ल’ या वेब शोचं शूटिंग करत होते. त्याचं स्क्रीप्ट वाचताना सहज माझ्या मनात प्रश्न आला, आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या काळातही हा निकष कशासाठी? गुड बॅड गर्ल ? का आपला समाज आजही अमुक स्त्री गुड आहे की बॅड, हा मापदंड लावतेय ? गुड किंवा बॅड हा निकष पुरुषांच्या बाबतीत लावला जातो का ? स्त्रीचे असे मूल्यांकन कशासाठी ? अर्थात समाज बदलायला काही काळ लागणारच.

हेही वाचा- भारतीय महिला फूटबॉलमधील ‘उद्याचे तारे’ घडण्यासाठी…

‘मिस इंडिया’ खिताब जिंकल्यानंतर माझी अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. माझ्या या कारकीर्दीला जरी २० वर्षं झाली असली तरी माझ्या नावावर खूप चित्रपट नाहीत, याचं एक मुख्य कारण म्हणजे मला माझ्या आयुष्यात एकाच वेळी अनेक कामं करायची होती, आहेत, फक्त अभिनय एके अभिनय करायचा नव्हताच कधी. अभिनय हा बघायला गेलं तर पूर्ण वेळचा व्यवसाय आहे. अनेक नामवंत कलाकारांनी त्यांची हयात या व्यवसायासाठी समर्पित केली. मी २००३ मध्ये जेव्हा ‘धूप’ या चित्रपटात प्रथम अभिनय केला तेव्हाच बॉलीवूडमधील कामाची पद्धत माझ्या लक्षात आली. त्यामुळे मी फारच सिलेक्टेड सिनेमात काम केलं. आलेल्या सगळ्या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. मला असं जाणवलं, मी जर भारंभार चित्रपट करत गेले तर मला माझ्या अन्य गुणांचा विचार करता येणार नाही. आय हॅव माय ओन व्हॉइस. मला माझे विचार आहेत, ते योग्य त्या आवश्यक ठिकाणी मला वापरायचे आहेत म्हणून अभिनयात स्वतःला फार गुंतवून घेतलं नाही.

माझ्यासाठी फिटनेसला वेळ देणं म्हणजे दररोजचं जेवण घेणं इतकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला त्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतोच. शरीराबरोबरच आपली सामाजिक जबाबदारी मी मानते. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होताना पाहाणं मला जमत नाही. म्हणून मी राजकारणात शिरले आणि ‘आम आदमी पार्टी’ जॉईन केली. आय बिलिव्ह इन सिलेक्टिव्ह वर्क ऑलवेज.

हेही वाचा- आकर्षक ‘अंडरआर्म्स’साठी चक्क मेकअप!

माझ्या घरात स्वयंपाकाला एक बाई येतात. तर इतर घरकामासाठीही एक बाई आहेत. शिवाय निहालला सांभाळण्यासाठी एक ‘पार्ट टाइम मेड’ आहे. पण तरीही मी किंवा ऋषी सतत त्याच्यासोबत राहातो. त्याच्यासोबत सतत कुणी तरी राहणं ही आम्हा दोघांची जबाबदारी मानतो आम्ही.

मी अतिशय फिटनेस फ्रीक आहे, हे निहालने त्याच्या जन्मापासून पाहिलं आहे. तो दोन वर्षांचा झाला आणि मी त्याला माझ्यासोबत सायकलिंगसाठी नेऊ लागले. अवघ्या ३ दिवसांत निहालने त्याच्या सायकलीला लावलेले साइडचे व्हील्स काढले आणि तो मस्त सायकल चालवू लागला. माझ्यासोबत तो पोहायलाही येतो. तेही ट्रेनिंग मी त्याला ३-४ दिवसात दिलं. अभ्यास, होमवर्क, त्याचे शाळेचे प्रोजेक्ट्स… त्यालाही अनेक गोष्टी करायच्या असतात. त्या करण्याबरोबरच त्याला विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तयार करणं, अशा सगळ्या कामांमध्ये मी आणि निहालचा बाबा एकत्रित सहभागी होतो.

हेही वाचा- महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे

ऋषीसारखा पती, आणि मदतीला घरकाम करणाऱ्या बाया यामुळे मला घर, संसार, मुलगा आणि करियर अशा सगळ्या आघाड्या समर्थपणे सांभाळता येतात. पण मुळात तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, ते ध्येय एकदा नक्की करून घ्यायला हवं. त्यादृष्टीने आयुष्याची आखणी करायला हवी तर सगळ्या आघाड्या नीट सांभाळता येतात.

samant.pooja@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balance between professional and personal life exclusive bollywood actor gul panag dpj
First published on: 29-10-2022 at 11:19 IST