पूजा सामंत

“चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वीच मी मानसिक तयारी करून ठेवली होती, की संघर्ष पावलोपावली असेल आणि त्यावाचून गत्यंतर नाही. कोणत्याही नव्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवायचे असल्यास कष्टांची आणि प्रसंगी मानापमान झेलायची तयारी ठेवली पाहिजे. एका चित्रपटास यश मिळालं म्हणजे पुढच्या चित्रपटाला मिळेलच असं नाही, याची खूणगाठ या क्षेत्रात येणाऱ्या, धडपडणाऱ्या प्रत्येकानं मनाशी बांधावी. म्हणजे संघर्षाचे चटके जाणवणार नाहीत. ‘हिट’ चित्रपटांपेक्षा ‘फ्लॉप’ झालेले चित्रपटच या क्षेत्रातले तुमचे अनुभव अधोरेखित करतात. त्यामुळे हिट आणि फ्लॉप या दोन्ही मला जमेच्याच बाजू वाटतात.” हे मत आहे अभिनेत्री तृप्ती डिमरी हिचं.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

आधी ‘बुलबुल’ आणि ‘कला’ या चित्रपटांमधून तृप्तीनं ‘ओटीटी’ माध्यमांवर आपल्यासाठी ओळख कमावलीच होती. त्यानंतर नुकत्याच आलेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात तिनं एक वेगळी भूमिका साकारली आणि तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र या क्षेत्रात टिकून राहायचं असेल, तर कामाप्रती निष्ठा, समर्पण, मेहनत आवश्यकच आहे. नाही तर तुम्हाला ‘रिटर्न तिकिट’ मिळतं, असं स्पष्ट मत ती व्यक्त करते.

आणखी वाचा-३०० रुपयांत कसंबसं चालवायची घर; आज इंग्रजीचे धडे देत करतेय बक्कळ कमाई, ही ‘देहाती मॅडम’आहे तरी कोण?

तृप्ती सांगते, “उत्तराखंड ते मुंबई- व्हाया दिल्ली आणि पुणे असा माझा अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठीचा प्रवास आहे. संघर्ष गरजेचा असला, तरी तो कोणत्या पातळीवर करावा हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. मला आई-वडिलांकडून पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळे घरच्या स्तरावर लढा द्यावा लागला नाही. जर मी नामांकित स्टारची मुलगी, बहीण वगैरे असते, तर मला त्यांनी कदाचित ‘लॉन्च’ केलं असतं. पण पहिल्या चित्रपटानंतर तिथेही ‘स्ट्रगल’ अटळच असतो. घरातले लोक असले, तरी ते पुन्हा पुन्हा लॉन्च करत नाहीत! माझ्यात क्षमता असेल तर मी या क्षेत्रात पुढे जाईन. माझा ‘पोस्टर बॉईज’ हा चित्रपट साधारण चालला होता. नंतर आलेला ‘लैला-मजनू’ चालला नाही. अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट मात्र नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि मला एक ओळख मिळाली.”

आणखी वाचा-सोळा फ्रॅक्चर, आठ शस्त्रक्रिया अन् कुटुंबाचा तीव्र नकार…; पाहा ‘या’ महिला IAS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास 

‘ॲनिमल’मधली ‘झोया’ ही खलनायिका आहे, हे कळल्यावर मी नकारच द्यायच्या बेतात होते, असं सांगून तृप्ती म्हणाली, “बडी स्टारकास्ट, पूर्ण कथा ऐकून मी होकार दिला आणि माझ्यासाठी या चित्रपटानं जादूच केली. ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक होती. झोया नायकाशी शय्यासोबत करून त्याच्या नियोजनाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असली, तरी तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता आहे. आँखो मी एक नमी-सी हैं! या व्यक्तिरेखेस तिरस्कार नव्हे, सहानुभूती मिळेल अशी मला खात्री वाटू लागली आणि मी ती स्वीकारली. यात रणबीर कपूरबरोबर माझे ‘इंटिमेट सीन’ आहेत. पण रणबीर अतिशय सुसंस्कृत अभिनेता आहे. मी ‘कम्फर्टेबल’ असावं यासाठी तो माझ्याशी गप्पा मारत होता. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीही हा प्रसंग चित्रित करतेवेळी तो अश्लील वाटणार नाही याची काळजी घेतली होती. या चित्रपटाच्या यशानं सकारात्मक-नकारात्मक या बाजूपेक्षा भूमिकेकडे लक्ष द्यावं, हे मला पटलं.”

samant.pooja@gmail.com