“निधी, तू पिकनिकला येणार आहेस ना? ख्रिसमसची सुट्टी आहे आपल्याला, सगळं प्लॅनिंग करायचं आहे, लवकर चल, सर्वजणी आल्या असतील.”

“ प्रज्ञा, अगं मी खरंच येऊ शकत नाही, नितीन दहावीत आहे, आपल्याला सुट्टी असली तरीही त्याची प्रिलिमची तयारी करून घ्यायची आहे, त्यामुळं प्लिज यावर्षी मला अजिबात आग्रह करू नकोस.”

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

“निधी, अगं, आपल्या सोसायटीतील लेडीजची ही फक्त एक दिवसाची ट्रिप आहे, सकाळी लवकर निघालो की रात्री नऊ वाजेपर्यंत आपण घरी येऊ, एक दिवस नीतू स्वतःचा अभ्यास स्वतः करेल.”

“ अगं, कसलं काय? तो स्वत:हून अभ्यास करणारा असता तर मला एवढा त्रास झाला असता का? जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्यांची सुट्टी मी घेतली आहे. त्याच्याजवळ बसून त्याच्याकडून सर्व काही करून घ्यावं लागतं.”

“ निधी अगं, त्याचे बाबा घरात असतीलच ना?”

“ते घरात असून काहीही उपयोग नाही, ते कधीही त्याचा अभ्यास घेत नाहीत, सगळं काही मलाच बघावं लागतं. नितूचे टाइम-टेबल मी ठरवलं आहे, त्याला मी काहीही कमी पडू देत नाही, त्यानं किती वाजता उठायचं?, कोणत्या वेळेला काय करायचं? कोणत्या वेळेला कोणता पदार्थ खायचा,अगदी सर्व काही मी प्लॅनिंग केलेलं आहे. मी एक दिवस नसले तरी सर्व डिस्टर्ब होऊन जाईल, सगळं वेळेवर व्हावं लागतं, याची दहावी संपेपर्यंत माझा स्ट्रेस काही कमी व्हायचा नाही.”

हेही वाचा… ‘त्या’ पुन्हा शिकण्याची स्वप्ने बघू लागल्या!

“ निधी, अगं तुझा मुलगा दहावीला आहे, तू नाहीस, तू एवढं टेन्शन का घेतेस? आणि मुलं दहावी बारावीला असली की पालकांना टेन्शन असतं, पण त्याला किती ताणायचं ते आपल्याला ठरवायचं असतं. तू स्वतःच्या सर्व ऍक्टिव्हिटी बंद केल्या आहेस, जिम बंद केलंस, भिशी पार्टीत येणं बंद केलंस, ऑफिसच्या कोणत्याही उपक्रमात भाग घेत नाहीस, नातेवाईकांच्या कोणत्याही कार्यक्रमात जात नाहीस, कोणातही मिसळत नाहीस, इतका ताण घेणं योग्य नाही. तू नितूला सर्व अभ्यास रेडिमेड दिलास, तर त्याला त्याची किंमतच कळणार नाही. एखाद्या गोष्टीत यशस्वी व्हायचं असेल तर आपण स्वतः कष्ट घ्यावे लागतात हे त्याला कसं समजणार? तो आता लहान नाहीये, त्याचे प्रश्न सोडवणं त्याला जमायला हवं, सर्वच ठिकाणी तू पुरी पडणार नाहीस.

मुलांची अभ्यासाची महत्वाची वर्षं असतील तर पालकांनीही गांभीर्य दाखवायला हवं पण येणारा ताण हा ‘चॉकलेट ताण’ म्हणजे पटकन संपणारा ठेवायचा की दीर्घकाल चालणारा ‘च्युइंगम ताण’ घ्यायचा हे आपणच ठरवायचं असतं. तू नितूसाठी खूप करते आहेस, अवश्य कर,पण तुझ्या शरीरावर, मनावर किती परिणाम होतो आहे, याचा विचार केला आहेस का? ’त्याची दहावी’, ‘त्याची दहावी’ हे पालुपद लावून तू तुझ्या आयुष्यातील सर्व आनंद घालवला आहेस. आणि याचा ताण नितूवर येतो आहे, याचा विचार तुझ्या मनातही येत नाही. तो सतत दडपणाखाली असल्यासारखा वागतो, स्वतःहून मुलांशी खेळायला जात नाही. कधी खेळायला आला तरीही मोकळेपणाने मुलांच्यात मिसळत नाही. सतत त्याचं लक्ष घड्याळाकडे असतं. तुझा आवाज आला तरी दचकतो, तुझं प्रेम नाही तर तुझी दहशत त्याच्यावर आहे. तो हुशार आहे, यात शंकाच नाही, पण सगळं येत असूनही या ताणामुळे तो परीक्षेत हवं तेवढं यश मिळवू शकला नाही तर?”

प्रज्ञा जे जे काही बोलत होती ते निधी लक्षपूर्वक ऐकत होतीच,पण त्याचबरोबर आपलं नक्की काय चुकतंय हे तिच्या लक्षात येत होतं. हल्ली नितू झोपेतून दचकून उठतो, त्या दिवशी तर ’मी खेळणार नाही, मी अभ्यास आधी पूर्ण करणार. नाही. मला खेळायला बोलवू नका,’असं झोपेत बडबडत होता. आपल्याकडून अतिरेक होतो आहे आणि ‘त्याची दहावी’ हे पालुपद लावून आपण घरातील सर्वच वातावरण कसं गंभीर केलं आहे हे तिला जाणवलं. ती बराच वेळ स्वतःशीच विचार करीत होती. प्रज्ञा म्हणते तसा नितूच्या दहावीचा ताण आपणच जास्त घेतलाय, आपणही थोडं बदलायला हवं, हे तिच्या लक्षात आलं.

ती म्हणाली, “प्रज्ञा, खरंय तुझं, मलाही थोडा बदल हवाच आहे, मी नक्की पिकनिकला येईन, आपण प्लॅनिंग करायला जाऊया.”

“ये हुयी ना बात,” असं म्हणून प्रज्ञाने तिला दाद दिली आणि खूप दिवसांनी निधी मनमोकळं हसली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smita joshi606@gmail.com