रानभाज्या जर सजगपणे लावायच्या ठरवल्या तर कुर्डू, केना या महत्त्वाच्या भाज्या आहेत. कुर्डूची भाजी कोवळी असताना तिचा पाला भाजीसाठी वापरता येतो, पण तिला तुरे आले की मात्र ती वापरता येत नाही. हिचे तुरे वाळवून जर बिया साठवल्या तर कुर्डू कुंडीत वाढवता येईल. तेच इतर भाज्यांबद्दलही करता येईल. घोळाच्या बियाही एकदा लावल्या की दरवर्षी नियमाने घोळ उगवत राहिलं, अंबाडीचेही तेच. टाकळा, फोडशी, भारंगी, कर्टुलं यांचं बी साठवून याही रानभाज्या आपल्याला आपल्या पुरत्या लावता येतील.

रानभाज्या हा निसर्गाने दिलेला जीवनसत्त्वांचा खजिना आहे. आपल्या गच्चीवर किंवा परसदारी जंगलात आढळणाऱ्या सगळ्याच रानभाज्या आपण लावू शकू असं नाही, पण त्या ओळखून, त्यांच्या बिया मिळवून जर पद्धतशीरपणे लागवड केली तर चवीतील विविधता जपता येईल.

हेही वाचा…आवा चालली पंढरपुरा…

शेवगा म्हणजे मोरिंगा हे आजकाल अतिशय चर्चेत असलेले झाड. एरवी गावात परसदारी आपण शेवगा सर्रास बघितलेला असतो. आजकाल मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांचं चूर्ण भरपूर किंमत देऊन विकत घेतलं जातं. शेवगा हा वृक्ष आहे तो गच्चीवर लावायचा तर मोठी कुंडी किंवा मग ड्रम हवा, तेव्हा कुठे त्याची चांगली वाढ होऊन त्याला फुलं आणि शेंगा येतील. एवढी जागा नसेल तर पावसाळ्याच्या सुमारास एका मध्यम कुंडीत आपण जर एखादं रोपं लावलं तर पानांची हमखास सोय होईल. वरचेवर छाटणी करत सेंद्रिय खतांचा वापर करत झाड वाढवलं तर शेवग्याच्या पानांची भाजी मिळत राहिल. मग मोरिंगा पावडर नको विकत आणायला. मी हा प्रयोग केला होता. माझा शेवगा असाच छोट्या कुंडीत वाढत होता. पावसात कोवळी पानं मी भाजीला वापरत असे. हिरवीगार भाजी आणि त्यावर पांढराशुभ्र खवलेलं खोबरं म्हणजे चैन होती. पावसाळ्या नंतर मात्र पानं उणावत, मग मी थोडी पानं कोथिंबीरीसारखी रोजच्या आमटीत वापरून माझी जीवनसत्वाची बेगमी करून घेत असे. पुढे हा शेवगा मी गावाला नेऊन लावला.

बेल, प्राजक्त हेही वृक्षच. त्यांनाही मी कुंडीत लावलं आहे. पावसाळा म्हणजे ऋतूबदल. माझी आजी पाऊस काळात एक काढा आम्हाला हमखास द्यायची. आलं, धने, लवंग असं थोडं कुटून त्यात प्राजक्त, बेल आणि तुळशीची पानं घालून गोडीसाठी खडीसाखरेचे खडे आणि मनुका घातल्या की एखाद्या चहासारखं सुरेख गरम पेय तयार व्हायचं.

काढा असला तरी तो प्यायला मजा यायची आणि तळातल्या त्या पाण्यात फुगलेल्या मनुका खाणं फार आवडायचं. या काढ्यासाठी मी बेल, तुळस आणि प्राजक्त ही झाडं मुद्दाम गच्चीवर लावली. औषधी वनस्पती आणि भाज्या अशा हातात हात घालून वाढताना बघणं मला आवडतं.

हेही वाचा…ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका

रानभाज्या जर सजगपणे लावायच्या ठरवल्या तर कुर्डू, केना या महत्त्वाच्या भाज्या आहेत. कुर्डूची भाजी कोवळी असताना तिचा पाला भाजीसाठी वापरता येतो, पण तिला तुरे आले की मात्र ती वापरता येत नाही. हिचे तुरे वाळवून जर बिया साठवल्या तर कुर्डू कुंडीत वाढवता येईल. तेच इतर भाज्यांबद्दलही करता येईल. घोळाच्या बियाही एकदा लावल्या की दरवर्षी नियमाने घोळ उगवत राहिलं, अंबाडीचेही तेच. टाकळा, फोडशी, भारंगी, कर्टुलं यांचं बी साठवून याही रानभाज्या आपल्याला आपल्या पुरत्या लावता येतील.

रानभाज्यांसारखंच रानकंदांचही विश्व फार सुरेख आहे. माझ्या लहानपणी मागच्या अंगणाला लागून असलेल्या पडवीत आमचा सख्या घोरक्यानाचे कंद लावायचा. पाणी तापवणाच्या चुलीजवळ, पडवीत म्हणजे चक्क घरात मोठा खड्डा करून सख्या कंद लावत असे. पाऊस सुरू झाला की त्याच्या ओलाव्यावर रोपं तरारून येत. बघता बघता वेल पडवीच्या अर्धवट उंचीच्या भिंती झाकून टाके. स्वयंपाकघरालगतच्या भिंतीवर वाढलेला, पण अंगणात नाही तर घरात लावलेला तो वेल बघणं ही एक वेगळीच गंमत होती. काय सुरेख दिसायचं ते दृश्य. निसर्ग हा असा दारात नाही, तर घरात आलेला बघणं ही पर्वणी होती.

हेही वाचा…समुपदेशन : बायकोचं माहेर का सलतंय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घोरक्यानाच्या कंदाचे काप, भाजी, उकडून, ठेचून खाणं असं बरंच काही मग होतं राहायचं. घोरक्यान, अळकुड्या, वळकंद, करंद, गराडू, रताळी अशी कंदाची एक समृद्ध चवीची वेगळी दुनिया होती. आजोळची ही सगळी मंडळी अजूनही माझ्या गच्चीवर दर पावसात जोमाने वाढतात. आपल्याला आवडणाऱ्या, चवीला आणि आरोग्याला उत्तम त्याचबरोबर करायला सोप्या अशा रानभाज्यांची यादी करून त्याचं बी मिळवलं तर घरच्याघरी हा खजिना उपलब्ध होईल. यासाठी दरवर्षी बिया आणायला नकोत. गच्चीवर किंवा कुंडीत लावलेली झाडं ही त्याच त्या मातीत वाढत असतात. आपण फक्त त्यातील कसं वाढवतो. माती बदलतो, पण टाकून देत नाही. या भाज्यांचा जीवनक्रम पूर्ण होऊन कुंडीत त्यांचं बी पडून असतं. पावसाळ्यात ते उगवतं आणि मग दरवर्षी मुद्दाम न लावता ही या रानभाज्या आपल्याला मिळत राहतात. हे इतकं सोपं गणित आहे. हे एकदा जाणलं की अनुभवांची समृद्धी वाढतच जाते. पुढच्या लेखात आपण कुंडीत लावता येतील असं नाही, पण उपयुक्त असतील अशा वेगवेगळ्या रानभाज्यांची माहिती घेऊया.

mythreye.kjkelkar@gmail.com