ब्रिटिश अभिनेत्री ग्लेंडा जॅक्सन यांचे गुरुवारी निधन झाले. केवळ अभिनेत्री या शब्दांमध्ये त्यांचे वर्णन करणे उचित होणार नाही. त्या चित्रपट आणि रंगभूमीवरील यशस्वी अभिनेत्री होत्याच, त्याच वेळी वयाच्या पन्नाशीमध्ये ग्लॅमर सोडून राजकारणात उतरण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. त्या लेबर पक्षाच्या खासदार होत्या, मात्र आपल्या पक्षाच्या न पटणाऱ्या धोरणावर जाहीरपणे टीका करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ८० व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाय ठेवला ती अजरामर ‘किंग लिअर’ नाटकातील प्रमुख भूमिका करण्यासाठी.

जॅक्सन यांची अभिनय क्षेत्रातील दादागिरी लक्षात घ्यायची असेल तर त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर नजर टाकता येईल. त्यांना १९७० च्या ‘विमेन इन लव्ह’ आणि १९७३ च्या ‘अ टच ऑफ क्लास’ या चित्रपटांसाठी दोन वेळा ऑस्कर, तीन वेळा ग्रॅमी आणि रंगभूमीवरील अभिनयासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा टोनी पुरस्कार एकदा मिळाला. त्यांनी १९७१ मध्ये बीबीसी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘एलिझाबेथ आर’ या मालिकेत किशोरी अवस्थेपासून वृद्धावस्थेतील राणीची भूमिका साकारली. त्याबद्दल त्यांच्या वाट्याला प्रशंसा आणि पुरस्कार दोन्ही आले.

Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?
Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

हेही वाचा – गच्चीवरची बाग : इतर कौशल्यांची गरज

त्यांच्याबद्दल बोलताना असे म्हटले जाई की, ग्लेंडा जॅक्सन यांनी अभिनयक्षेत्रात वावरताना आणि त्याबाहेरील जगामध्ये जगताना स्वतःमधील उत्कटता, वेदना, विनोद, संताप, जिव्हाळा आणि इतर अनेक भावनांचे यथार्थ दर्शन घडवले. ज्या वर्षी एलिझाबेथ आर मालिका टीव्हीवर गाजत होती त्याच वर्षी न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, ‘मला जोखीम घ्यायला आवडते आणि ही जोखीम केवळ मनोरंजनासाठी असलेल्या रचनेपेक्षा मोठी असायला हवी’.

स्वतःला सातत्याने आव्हान देणाऱ्या व्यक्ती स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवू शकतात, त्याला पैलू पाडू शकतात याची जॅक्सन यांच्याकडे पाहून खात्री पटते. अभिनय क्षेत्रात उत्तम काम करत असतानाच त्या राजकारणाकडे वळाल्या. राजकारणाची आवड त्यांना आधीपासूनच होती. डाव्या विचारसरणीकडे कल असल्यामुळे वयाच्या १६ व्या वर्षीच त्या लेबर पार्टीच्या सदस्य झाल्या होत्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना १९७८ मध्ये अँटी-नाझी लीग या नाझीविरोधी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. त्यानंतर १९९२ मध्ये त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आणि लेबर पार्टीच्या सदस्य म्हणून त्याच वर्षी त्या पार्लमेंटमध्ये निवडूनही गेल्या. त्या सत्ताधारी पक्षात नव्हत्या पण विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे मांडणाऱ्या खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

पाच वर्षांनी म्हणजे १९९७ मध्ये लेबर पार्टी सत्तेत आल्यावर जॅक्सन यांच्याकडे उपमंत्रिपदाची (ज्युनियर मिनिस्टर) जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्याकडे लंडनच्या वाहतुकीचे खाते सोपवण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांनंतर लंडनच्या मेयरपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी राजीनामा दिला, पण त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्याच सुमारास ब्रिटनने इराकमध्ये केलेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावरून त्या सरकारच्या आक्रमक टीकाकार झाल्या. त्यानंतर २०१० च्या निवडणुकीत त्या अगदी कमी फरकाने पुन्हा विजयी झाल्या.

हेही वाचा – चल ना गडे ‘पिकनिक’ला!

ब्रिटनच्या राजकारणातील पोलादी स्त्री अशी ओळख असलेल्या मार्गारेट थॅचर यांचे २०१३ मध्ये निधन झाले. त्या वेळी बहुसंख्य ब्रिटिश नागरिक शोक व्यक्त करत असताना जॅक्सन यांनी मात्र, थॅचर यांच्या धोरणांनी ‘देशाचे प्रचंड सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक नुकसान केले’ अशी प्रतिक्रिया दिली. यावरून बराच वाद झाला. खुद्द स्वतःचा पत्रकार मुलगा डॅन हॉजेस यांच्याकडून त्यांना टीका सहन करावी लागली. यानंतर मात्र २०१५ मध्ये निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पुन्हा एकदा अभिनयाकडे वळल्या.

वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’ने त्यांना पुन्हा एकदा प्रशंसा मिळवून दिली. ही भूमिका करण्यासाठी आवश्यक शारीरिक किंवा आवाजाची क्षमता आपल्याकडे आहे की नाही अशी शंका त्यांना भेडसावत होती. मात्र, हे नाटक अनुभवलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील ते तास पुढील अनेक वर्षे महत्त्वाची असतील या शब्दांमध्ये डेली टेलिग्राफने त्यांच्या भूमिकेचे परीक्षण केले. दोन वर्षांनंतर त्यांना ‘थ्री ऑल विमेन’साठी रंगभूमीचा प्रतिष्ठित टोनी पुरस्कार मिळाला.