सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे या फणसाचे मूळ स्थान आहे. त्यातही बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. संस्कृतमध्ये बीजपूर अज्जीरं, मराठीत फणस, तर इंग्रजीत जॅकफ्रूट व शास्त्रीय भाषेत अटरेकारपस हेट्रोफायलस या नावाने प्रसिद्ध असलेल्या फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणस हे अरटिकसी या कुळातील आहे. तर बरका व कापा फणस अशा त्याच्या दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर चविष्ट व कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात तर बरकामध्ये गोड व लिबलिबीत नरम व पांढरे गरे आढळतात. फणसावर जाड काटे असतात. फणसाचे गरे व आठळ्या दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म आहेत. फणसाचे साधारणपणे वजन २०-२२ किलोपासून ४० किलोपर्यंत असते.

आणखी वाचा : सुंदर त्वचा हवी? ‘बनाना’ हैं ना!

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

औषधी गुणधर्म
पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाचे गरे व आठळ्यांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आर्द्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात. या सर्व गुणधर्मांमुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो.

आणखी वाचा : T20 World Cup 2023: ‘आम्हाला माहित आहे काय महत्वाचे आहे’; भारत-पाक सामन्यापूर्वी हरमनप्रीतची गर्जना

उपयोग
० फणसाचे गरे सुकवून नंतर त्याचे दळून पीठ करून त्याची पातळ पोळी किंवा पुरी बनविल्यास वर्षभर फणसाचा आस्वाद घेता येतो.
० लहान मुलांना ही फणसाची पोळी खाण्यास द्यावी, यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते.
० फणसांच्या गऱ्याची खीर व कढीही उत्कृष्ट होते. तसेच फणसापासून जाम, जेली, मुरंबा तयार करता येतो. हे सर्व पदार्थ लहान मुलांना आवडतात म्हणून या सर्व पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कच्च्या फणसाची भाजी करावी. तसेच आठळ्या ओल्या असतानाच त्यांची भाजी करावी किंवा वाफवून आंब्याच्या कोयीप्रमाणे खावीत.

आणखी वाचा : आहारवेद : पोषक गुणधर्मांचा पडवळ

० फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ करावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे करावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप असणारे रुग्ण, तसेच कृश व्यक्ती यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठळीच्या पिठाचा वापर करावा. आठळीच्या पिठापासून खीरही बनविता येते. रुग्णांसाठी खीर बनवून तिचा वापर करावा.
० फसणाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो.
० फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.
० फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.
० सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.

आणखी वाचा : सासरीही मिळतंय प्रेम आणि पाठबळ – श्रेया बुगडे

० फणसाचा चीक शरीरावर जर बेंड आले असेल तर उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या ‘पू’चा निचरा होतो.
० कृश व्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी रोज ७-८ फणसाचे गरे खावेत किंवा त्याच्या आठळ्याची खीर करून खावी.

सावधानता
फणस हे पौष्टिक असल्याकारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे, परंतु फार गरे खाल्ल्यास त्यामध्ये असणाऱ्या एन्झाइममध्ये अपचन होऊन जुलाब होतात. म्हणून सहसा फणस जेवण झाल्यावर खाऊ नये. फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यावर नागवेलीचे पान खाल्यास पोट फुगते व खूप त्रास होतो. अशा वेळी लिंबूपाणी प्यावे. त्यामुळे पोटफुगी कमी होते. पोट जास्त भरलेले नसताना मधासोबत गरे खाल्ल्यास बाधत नाहीत.

sharda.mahandule@gmail.com